घरमुंबईपोईसर नदीच्या पात्रात अडथळा ठरणारी १६ बांधकामे हटवली

पोईसर नदीच्या पात्रात अडथळा ठरणारी १६ बांधकामे हटवली

Subscribe

आर दक्षिण परिसरातून वाहणाऱ्या पोईसर नदीकाठी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे. यासाठी या परिसरातील सुमारे १३० बांधकामे, झोपड्या प्रभावीत होणार आहेत.

मुंबई महानगरपालिका (Mumbai Municipal Corporation) क्षेत्रात असणाऱ्या विविध नद्यांपैकी पोईसर नदी (Poisar Riv) ही एक महत्त्वाची नदी आहे. ही नदी आर दक्षिण विभागातील अर्थात कांदिवली पश्चिम (Kandivali West) परिसरातील मंगूभाई दत्ताजी पुलाच्या जवळ असणाऱ्या लालजी पाडा परिसरातून देखील वाहते. पावसाळ्याच्या (monsoon season) कालावधीत अतिवृष्टीवेळी नदीलगतच्या परिसरात पाणी भरण्याची शक्यता असते. या अनुषंगाने प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमध्ये नदीच्या किनारी संरक्षक भिंत (protective wall) बांधण्याचाही समावेश आहे. मात्र, ही भिंत बांधण्यात येथील बांधकामांचा आणि झोपड्यांचा अडथळा येत होता.

स्थानिकांचे चांगले सहकार्य

- Advertisement -

अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनानुसार परिमंडळ ७ च्या उप आयुक्त डॉ.  भाग्यश्री कापसे यांच्या स्तरावर सातत्याने समन्वय बैठकांचे आयोजन करण्यात येऊन संबंधितांशी संवाद साधण्यात आला. यानंतर सोमवारी सकाळपासून करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील कारवाईदरम्यान १६ बांधकामे, झोपड्या हटविण्यात (demolished) आल्या आहेत. विशेष म्हणजे या कारवाईदरम्यान स्थानिकांचे चांगले सहकार्य महानगरपालिका प्रशासनाला लाभले, अशी माहिती उप आयुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले यांनी दिली आहे.

१३० बांधकामे, झोपड्या प्रभावीत

- Advertisement -

आर दक्षिण परिसरातून वाहणाऱ्या पोईसर नदीकाठी संरक्षक भिंत बांधणे गरजेचे आहे. यासाठी या परिसरातील सुमारे १३० बांधकामे, झोपड्या प्रभावीत होणार आहेत. तथापि, येत्या पावसाळ्यापूर्वी ज्या भागात भिंत बांधणे प्राधान्यक्रमानुसार आत्यंतिक गरजेचे आहे, अशा भागातील २९ बांधकामे पहिल्या टप्प्यात हटविण्यात येणार आहेत. या २९ बांधकामांपैकी १६ बांधकामे सोमवारी हटविण्यात आली आहेत. तर उर्वरित १३ बांधकामेदेखील पाठोपाठ हटविण्यात येणार आहेत. ही बांधकामे हटविल्यानंतर लगोलग संरक्षक भिंतीचे बांधकाम देखील महानगरपालिकेद्वारे सुरु करण्यात येणार आहे.

पोलीस बंदोबस्तात कारवाई

कारवाईसाठी मुंबई पोलीस दलातील २० कर्मचारी घटनास्थळी तैनात होते. तथापि, स्थानिक नागरिकांशी वेळोवेळी साधण्यात आलेला सुसंवाद व समन्वय बैठका यामुळे स्थानिकांनी या कारवाईस सहकार्य केले. या कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेचे ७५ कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते. तसेच जेसीबी, पोकलेन यासारख्या यंत्रसामुग्रीचा वापरही यावेळी करण्यात आला, अशी माहिती आर दक्षिण विभागाच्या सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -