घरमुंबईपालिका निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्या

पालिका निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाच्या पदांवरील अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्या

Subscribe

उप प्रमुख अभियंत्यांना बढती, प्रमुख अभियंता पदी वर्णी; विनोद चिठोरे, प्रमुख अभियंता यांची विकास नियोजनमधून दक्षता विभागात बदली तर चक्रधर कांडळकर उप प्रमुख अभियंता यांना कोस्टल रोड प्रमुख अभियंता पदी बढती

मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक तोंडावर आलेली असताना रस्ते, वाहतूक, पूल, पाणीपुरवठा प्रकल्प, कोस्टल रोड, विकास नियोजन, दक्षता , स्थापत्य अभियांत्रिकी गट आदी महत्वाच्या खात्यात काही अधिकाऱ्यांच्या अचानकपणे बदल्या करण्यात आल्या तर काहींना पदोन्नतीने बढती देऊन प्रमुख अभियंता यांसारखी महत्वाच्या पदांवर बसविण्यात आले आहे.

त्यामुळे अचानकपणे झालेल्या बदलीचे कमी – अधिक प्रमाणात रस्ते, पूल, कोस्टल रोड आदींसारख्या प्रकल्पावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण, सदर खात्यांतील अधिकारी हे त्या त्या खात्यात अनुभवी असून निवडणुकीच्या तोंडावर बदल्या झाल्याने संबंधित खात्यातील कामांवर उलटसुलट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

मुंबई महापालिका विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांची प्रमुख अभियंता दक्षता एक खात्यात अचानक बदली करण्यात आली आहे. तर मुंबईसाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वप्न असलेल्या ‘कोस्टल रोड’ प्रकल्पाच्या प्रमुख अभियंता पदावर चक्रधर कांडळकर उप प्रमुख अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी गट यांना पदोन्नतीने बढती देण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ‘कोस्टल रोड’ प्रमुख अभियंता, प्रभारी या पदाची जबाबदारी पार पाडणारे विजय निगोट यांचा कार्यभार हलका करण्यात आला आहे.

खालील अधिकाऱ्यांच्या बदल्या, बढत्या

- Advertisement -

(१) विनोद चिठोरे, प्रमुख अभियंता, विकास नियोजन यांची प्रमुख अभियंता, दक्षता पदावर बदली करण्यात आली आहे.

(२) अतुल कुलकर्णी, उपप्रमुख अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी गट यांना प्रमुख अभियंता, विकास नियोजन पदावर बढती देण्यात आली आहे.

(३) चक्रधर कांडळकर, उपप्रमुख अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी गट यांना कोस्टल रोड प्रमुख अभियंता पदी बढती देण्यात आली आहे.

(४)सतीश ठोसर, उपप्रमुख अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी गट यांना प्रमुख अभियंता पूल विभाग पदावर बढती देण्यात आली आहे.

(५) उल्हास महाले, उपप्रमुख अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी गट यांना प्रमुख अभियंता, रस्ते व वाहतूक या पदावर बढती देण्यात आली आहे.

(६) अशोक मिस्त्री, उपप्रमुख अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी गट यांना प्रमुख अभियंता, पाणी पुरवठा प्रकल्प या पदावर बढती देण्यात आली आहे.

(७) राजेश पाटगांवकर , उपप्रमुख अभियंता, स्थापत्य अभियांत्रिकी गट यांना प्रमुख अभियंता, नागरिक प्रशिक्षण संस्था व संस्कार केंद्र या पदावर बढती देण्यात आली आहे.

(८) अतुल पाटील, प्रमुख अभियंता, मलनि: सारण प्रकल्प यांना नगर अभियंता पदावर बढती दिली असून त्यांच्याकडे मलनि: सारण प्रकल्प खात्याचा अतिरिक्त कार्यभारही सोपविण्यात आलेला आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -