घरताज्या घडामोडीमुंबई महापालिका मुख्यालयात होणार 'हेरिटेज वॉक'

मुंबई महापालिका मुख्यालयात होणार ‘हेरिटेज वॉक’

Subscribe

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुंबई महापालिका मुख्यालयातील पुरातन इमारतीत वेगळा साज चढविण्यात येत असून यासाठीच्या कामाला जोरदार तयारी सुरू झाली आहे.

पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबई महापालिका मुख्यालयाच्या पुरातन इमारतीचे दरवाजे नववर्षात देश, विदेशातील पर्यटकांसाठी उघडण्यात येणार आहेत. युवानेते आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या पर्यटन खात्याच्या मंत्रिपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीपासून मुंबईत पर्यटनाला चालना देण्याचा प्रयत्न केला. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महापालिका मुख्यालयातील १२५ पेक्षा जास्त वर्षांचा वारसा लाभलेल्या पुरातन इमारतीत पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वेगळा साज चढविण्यात येत आहे. यासाठी कामाची लगबग सुरू आहे.

पालिका मुख्यालयातील दोन्ही इमारतींवर एलईडी लायटिंग सोडण्यात आली आहे. पालिका मुख्यालयाच्या सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही इमारतींच्या मोक्याच्या आणि दर्शनीय ठिकाणी ८४ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. काही ठिकाणी अगोदरच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते.

- Advertisement -

मुंबई महापालिकेच्या गॉथिक शैलीतील इमारतीचा ऐतिहासिक वारसा उलगडला जाणार आहे. या वास्तूचे रुपांतर पर्यटन क्षेत्रात व्हावे यासाठी पालिका आणि महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ यांच्यात सामंजस्य करार ऑक्टोबर महिन्यात करण्यात आला आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका मुख्यलयात काल (रविवारी) भेट देऊन पाहणी केली आणि विविध कामांचा आढावा घेतला.

- Advertisement -

गाईडसोबत पालिका मुख्यालयात सफर

मुंबई महापालिका मुख्यालयाची तीन मजल्यांची इमारत ही गॉथिक शैलीतील दगडी कामातून तयार करण्यात आलेली आहे. गॉथिक शैलीतील हे काम जागतिक वारसा असलेल्या वास्तूंमध्ये मोडते. शेजारीच पालिकेची ६ मजली नवीन इमारत आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या धर्तीवर मुंबई महापालिका मुख्यालयात गाईडच्या मदतीने पर्यटकांना मोफत सैरसपाटा करता येणार आहे.

वास्तूत काय पाहता येणार ?

पालिका मुख्यालयाच्या जुन्या इमारतीमध्ये, महापौर, उप महापौर, आयुक्त, सभागृहनेत्या, विरोधी पक्षनेते, विविध समित्यांचे अध्यक्ष, विविध राजकीय पक्षांची कार्यालये आहेत.

महापौर कार्यालयाशेजारी पुरातन आणि प्रशस्त सभागृह आहे. त्यात, मुंबईतील नवनिर्वाचित २२७ नगरसेवक आणि ५ नामनिर्देशीत नगरसेवक कामकाज करतात.

सभागृहात, महापुरुषांचे पुतळे आहेत. स्थायी समिती, शिक्षण समितीचे सभागृह आहे. तसेच, पालिका मुख्यालयासमोरच नव्याने सेल्फी पॉईंट उभारण्यात अलेला आहे . त्याला चांगला प्रतिसाद लाभत आहे.


हेही वाचा – मुंबई मेट्रोची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -