घरताज्या घडामोडीOmicron Alert : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेची Home Quarantine नियमावली

Omicron Alert : आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मुंबई महापालिकेची Home Quarantine नियमावली

Subscribe

मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातील फ्लाईट्सने येणाऱ्या प्रवाशांना मुंबई महापालिकेने (MCGM) नवीन होम क्वारंटाईन (Home Quarantine) SOP जाहीर केली आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटूंब कल्याण विभागाच्या गाईडलाईन्सवर आधारीतच ही नियमावली आहे. मुंबई महापालिकेने होम क्वारंटाईनची कडक नियमावली जाहीर केली आहे. ज्या देशांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉनचा फैलाव वाढला आहे, अशा देशांमधून आलेल्या प्रवाशांसाठी ७ दिवस सक्तीचे क्वारंटाईन जाहीर करण्यात आले आहे. या नागरिकांना सक्तीचे होम क्वारंटाईन असेल. covid-19 चा प्रसार रोखण्यासाठी महापालिकेने ही नियमावली जाहीर केली आहे. ओमिक्रॉनसाठीच्या गाईडलाईन्सची अंमलबजावणी सक्तीने करण्याच आदेशही महापालिकेने दिले आहेत. (Mumbai municipal corporation Home Quarantine Rules Amid Omicron Threat)

Omicron साठीच्या गाईडलाईन्सनुसार MIAL कडून फ्रत्येक दिवशी मुंबईत येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची यादी प्रत्येक २४ तासांमध्ये जाहीर करावी लागणार आहे. ही यादी मुंबई महापालिकेच्या डिझास्टर मॅनेजमेंट युनिटला द्यावी लागणार आहे. या युनिटकडून महापालिकेच्या सर्व वॉर्डच्या वॉर रूमला आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना ही यादी देण्यात येईल. मुंबई महापालिकेच्या डिझास्टर मॅनेजमेंट कक्षाला यासाठीची सॉफ्टव्हेअर तयार करण्याचे आदेशही देण्यात आले आहे. सॉफ्टव्हेअरमध्ये प्रवाशांची यादी आणि पत्ता अशी वर्गवारी करणे अपेक्षित आहे. प्रत्येक दिवशी सकाळी १० वाजता ही यादी महापालिकेच्या वॉर्डनिहाय वॉर्ड रूमला वितरीत करण्यात येणार आहे. त्यानंतर महापालिकेच्या EPID सेलच्या माध्यमातून सर्व व्यक्तींचे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग करण्यात येईल.

- Advertisement -

महापालिकेच्या वॉर रूममधून आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेल्या प्रत्येक प्रवाशाला यादीनिहाय कॉल करण्यात येईल. त्यामध्ये सक्तीने ७ दिवसांचे होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यासोबतच नागरिकांच्या शंकांचे समाधान आणि समुपदेशनही करण्यात येणार आहे. WWR च्या टीमकडून दिवसातून पाच वेळा कॉल करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात येईल. तसेच आरोग्याची माहिती घेण्यात येईल.

- Advertisement -

तसेच महापालिकेच्या टीमकडून त्या रहिवासी सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनाही होम क्वारंटाईनबाबतची माहिती देण्यात येणरा आहे. क्वारंटाईन असलेल्या घरांमध्ये कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीला प्रवेश देण्यात येणार नाही. या गोष्टीचे उल्लंघन झाल्यास त्या सोसायटीमधील पदाधिकाऱ्यांना जबाबदार ठरविण्यात येईल. अशा व्यक्तींच्या घरी नियमितपणे एम्ब्युलन्स पाठवण्यात येईल, तसेच त्या व्यक्तींची वैद्यकीय चाचणीही होम क्वारंटाईनच्या प्रोटोकॉलनुसार करण्यात येईल. अशा नागरिकांना RTPCR चाचणी करणेही बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी नागरिकांची टीम पाठवण्यात येईल अथवा व्यक्ती स्वतःही ही चाचणी करू शकतो.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -