नालेसफाईत दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदाराला अवघा साडेतीन लाखांचा दंड

पालिकेने, शहर व उपनगरातील मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या कामासाठी ७ कंत्राटदार तर लहान नाल्यांच्या सफाईसाठी २४ वॉर्डात २४ कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. पालिकेने प्रत्येक कंत्राटदाराला ३१ मे पर्यंत ७५ टक्के नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.

पावसाळा (monsoon) तोंडावर आलेला असताना नालेसफाईच्या (Drain cleaning) कामात दिरंगाई करणाऱ्या ‘भूमिका’ (Bhumika) या कंत्राटदारावर (contractor) साडेतीन लाख रुपये दंड आकारण्याची मुंबई महापालिकेने (mumbai munciple corporation) कारवाई केली आहे. नालेसफाई कामांचे कंत्राट कोट्यवधी रुपयांचे असताना पालिकेने अवघा साडेतीन लाख रुपये दंड ( fine) आकारल्याने पालिका वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

२४ वॉर्डात २४ कंत्राटदार

पालिकेने, शहर व उपनगरातील मोठ्या नाल्यांच्या सफाईच्या कामासाठी ७ कंत्राटदार तर लहान नाल्यांच्या सफाईसाठी २४ वॉर्डात २४ कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे. पालिकेने प्रत्येक कंत्राटदाराला ३१ मे पर्यंत ७५ टक्के नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. मात्र वरळी, दादर, माहीम, धारावी, वडाळा या भागातील नालेसफाईच्या कामात दिरंगाई केल्याप्रकरणी ‘भूमिका’ या कंत्राटदाराला पालिकेने प्रथम कारणे दाखवा नोटिस बजावली होती. मात्र कंत्राटदाराने दिलेल्या स्पष्टीकरणावर पालिकेने असमाधान व्यक्त करीत फक्त साडेतीन लाखांचा दंड ठोठावला आहे.

२५० कोटी रुपये खर्च

दरम्यान, शहर भागात लहान – मोठ्या नाल्यांची ८७.१२ टक्के सफाई पूर्ण झाली आहे. नालेसफाईची संपूर्ण कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करायची आहेत. पावसाळ्यापूर्वी ७५ टक्के, पावसाळ्यात १५ टक्के तर पावसानंतर १० टक्के नालेसफाईची कामे पूर्ण करण्याचे पालिकेचे नियोजन आहे. मुंबई महापालिका नालेसफाईच्या कामांवर १६० कोटी रुपये तर पावसाळ्यात सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या भाडे तत्त्वावरील ४०० पंपांवर ९० कोटी रुपये असे एकूण २५० कोटी रुपये खर्च करणार आहे.

एकूण ८१७ नाले

मुंबईत एकत्रित ३०९ मोठे नाले आहेत. त्‍यांची लांबी साधारणतः २९० किलोमीटर आहे. तसेच मुंबईत ५०८ छोटे नाले असून त्यांची लांबी ६०५ किलोमीटर आहे.या व्यतिरिक्त महापालिका क्षेत्रात रस्‍त्‍यालगत गटारे असून त्यांची लांबी जवळपास २,००४ किलोमीटर आहे.