HomeमुंबईBMC : प्रदूषण वाढल्याने पालिकेची ‘नेव्ही’ला नोटीस; घाटकोपर, गोवंडी रडारवर

BMC : प्रदूषण वाढल्याने पालिकेची ‘नेव्ही’ला नोटीस; घाटकोपर, गोवंडी रडारवर

Subscribe

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधितांची तातडीची बैठक घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत संबंधित यंत्रणांना, अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्यानुसार, मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कठोर भूमिका घेत आणि कारवाईचा बडगा उगारला.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील अडीच हजार इमारती बांधकामांमुळे प्रदुषणात वाढ झाली होती. त्याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधितांची तातडीची बैठक घेऊन प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत संबंधित यंत्रणांना, अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. त्यानुसार, मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी कठोर भूमिका घेत आणि कारवाईचा बडगा उगारला. प्रदूषण वाढीबाबत महापालिकेने पूर्व इशारा दिल्यानंतरही कुलाबा, नेव्ही नगर येथील इमारत बांधकामांमुळे प्रदूषणात वाढ झाल्याने त्याची गंभीर दखल घेत ‘नोटीस’ बजावली आहे. (Mumbai Municipal Corporation issues notice to Navy Nagar due to increase in pollution)

एकीकडे बोरिवली, भायखळा येथील प्रदूषणात घट झाल्याने त्यावर समाधान व्यक्त करीत सदर ठिकाणच्या बांधकामावर घालण्यात आलेली बंदी पालिकेने हटवली आहे. पालिकेने मुंबईत सरसकट घातलेले निर्बंध हटविण्याचे कालच जाहीर केले. तर, दुसरीकडे घाटकोपर आणि गोवंडी परिसरात इमारत बांधकामांमुळे प्रदूषणात वाढ झाल्याने ही दोन्ही ठिकाणे पालिकेच्या रडारवर आली आहेत. येथील प्रदूषणात लवकरात लवकर घट न झाल्यास येथील इमारती बांधकामांवर कोणत्याही क्षणी बंदीची कुऱ्हाड कोसळू शकते.

हेही वाचा – Torres Scam : कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी तिघांना अटक; लाखो गुंतवणूकदारांची फसवणूक

भायखळा आणि बोरिवली (पूर्व) येथील इमारती बांधकामे, खोदकाम यावर तातडीने बंदी घातली. तसेच, प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे फर्मान पालिकेने काढले. त्यानंतर काहीच दिवसात प्रदूषणात घट झाल्याने पालिकेने भायखळा, बोरिवली (पूर्व) येथील बांधकामावर घातलेले निर्बंध उठवले. मात्र त्याचसोबत जर प्रदूषण पुन्हा वाढले तर कारवाई करणारच असा इशाराही दिला होता. त्यानुसार कुलाबा नेव्ही नगर येथील इमारती बांधकामांमुळे सदर परिसरात प्रदूषणात वाढ झाल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्याची गंभीर दखल घेत पालिकेने संबंधितांना नोटीस बजावली.

त्याचप्रमाणे, घाटकोपर येथे एक्यूआय 284 (हवा खराब दर्जा), शिवाजीनगर-गोवंडी येथे एक्यूआय 274 (हवा खराब दर्जा), सिद्धार्थनगर, वरळी – एक्यूआय 117 (समाधानकारक हवा), बोरिवली – एक्यूआय 114 – (समाधानकारक हवा), भायखळा – एक्यूआय 129 (समाधानकारक हवा) असे पालिकेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे घाटकोपर आणि गोवंडी विभाग महापालिकेच्या रडारवर आले आहे. या विभागात पालिकेकडून कोणत्याही क्षणी कारवाई होऊ शकते.

हेही वाचा – Dadar Shivaji Park : शिवाजी पार्कच्या धूळमुक्तीसाठी आयआयटी सुचवणार उपाययोजना


Edited By Rohit Patil