आता बोरिवली येथील नॅन्सी काॅलनी रस्त्याची मालकी मुंबई महापालिकेकडे

Mumbai Municipal Corporation owns Nancy Colony Road near Borivali

मुंबई -: गेल्या अनेक वर्षांपासून बोरिवली येथील नॅन्सी काॅलनी रस्त्याची मालकी नवीनचंद्र चोगले या खासगी मालकाकडे होती. मात्र पालिका प्रशासनाने सदर रस्ता ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करून सदर खासगी मालकाला त्याचा मोबदला अदा केला आहे. त्यामुळे आता या खासगी रस्त्याची दुरुस्ती करणे पालिकेला शक्य होणार आहे.
हा रस्ता मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित होण्यासाठी (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) शिवसेनेचे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे, प्रभाग क्रमांक ५ चे माजी नगरसेवक संजय घाडी व प्रभाग क्रमांक ११ च्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांनी अथक प्रयत्न केले.

बोरिवली येथील नॅन्सी काॅलनी रस्त्याची मालकी गेल्या १५ वर्षांपासून नवीनचंद्र चोगले या खासगी मालकाकडे होती. त्यामुळे या रस्त्याची डागडुजी करणे पालिकेला शक्य होत नव्हते. ही गंभीर बाब लक्षात घेऊन व अनेक नागरिकांची मागणी पाहता शिवसेनेचे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे, प्रभाग क्रमांक ५ चे माजी नगरसेवक संजय घाडी व प्रभाग क्रमांक ११ च्या माजी नगरसेविका रिद्धी खुरसंगे यांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार पत्राद्वारे मागणी करून त्यासाठी आवश्यक पाठपुरावा सातत्याने केला. राज्य शासन व पालिकेकडे संबंधित अधिकाऱ्यांसोबत वारंवार बैठका घेतल्या तेव्हा कुठे त्याला चांगलेच यश लाभले.

आता सदर रस्त्याची कायदेशीर मालकी मुंबई महापालिकेला मिळाली आहे. खाजगी मालक नवीनचंद्र चोगले यांना त्यांच्या जागेचा मोबदला मुंबई महापालिकेने देण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन मालकी मिळवली आहे. यामुळे लवकरच हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा बनविण्याचे काम करता येणार आहे, अशी माहिती माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे व संजय घाडी यांनी दिली.

सदर रस्ता पालिकेच्या ताब्यात आल्याने शिवसेना विभागप्रमुख आ.विलास पोतनीस व शिवसेना प्रवक्त्या, उपनेत्या संजना घाडी यांच्या उपस्थितीत शनी मंदिर, चोगले नगर, बोरीवली, मुंबई येथे रविवारी एक सभा घेऊन श्रीफळ वाढवून, ढोलताशे वाजवून, गुलाल उधळून व पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला. या कामामुळे भविष्यात येथील नागरिकांचा वाहतुकीचा वेळ वाचणार आहे तसेच बेस्टची सेवा देखील उपलब्ध होईल.यावेळी शिवसेना विधानसभा संघटक अशोक म्हामुणकर, शाखाप्रमुख संदीप शेलार,सुबोध माने, चोगले नगर येथील उपशाखाप्रमुख सुरेश महाडिक, विजय साळवी, अशोक भोसले, पटवर्धन घाडी, नाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.


बिहारच्या वैशालीमध्ये भरधाव ट्रकने शेकडो नागरिकांना चिरडले; 15 जणांचा मृत्यू