कोरोनाबरोबरच पावसाळी आजारांसाठीही पालिका सज्ज

मुंबईत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आलेला आहे. या पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू यांसारखे आजार उद्भवतात. त्यामुळे पालिका आरोग्य यंत्रणेला कोरोनासोबतच साथीच्या आजारांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे हे पालिका आरोग्य यंत्रणेसमोर एक मोठे आव्हान आहे.

मुंबईत पावसाळा तोंडावर आलेला आहे. त्यातच कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर दुसरीकडे पावसाळी आजार उद्भवण्याची शक्यता पाहता पालिका आरोग्य यंत्रणेने त्यासाठी जय्यत तयारी केली आहे. पालिकेच्या रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी बेडस, औषधे, ऑक्सिजन आदींची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. तर पावसाळी आजारांसाठीही १,५३४ बेडस राखीव ठेवले असून औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. शक्यतो रुग्णांना त्यांच्या घराजवळील पालिका रुग्णालयातच उपचार देण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार व पालिका कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

घरगुती औषधोपचार टाळावेत

नागरिकांनीही साथीच्या आजारांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. तसेच, घरगुती औषधोपचार टाळावेत. साथीच्या आजारांची काही लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित नजीकच्या रुग्णालयात, दवाखान्यात जाऊन डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी. कोरोनासह इतर आजारांचे वेळेत निदान व उपचार मिळू शकतात, असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी केले आहे.

 १९१ दवाखाने व २१२ आरोग्य केंद्रे सुसज्ज

मुंबईत सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यातच पावसाळा तोंडावर आलेला आहे. या पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू यांसारखे आजार उद्भवतात. त्यामुळे पालिका आरोग्य यंत्रणेला कोरोनासोबतच साथीच्या आजारांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे हे पालिका आरोग्य यंत्रणेसमोर एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे पालिका आरोग्य यंत्रणेने, मुंबईतील ५ वैद्यकीय महाविद्यालयांसोबतच, कस्तुरबा रुग्णालयात बेड्स, औषधे आदींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, पालिकेची १६ सर्वसाधारण रुग्णालये, १९१ दवाखाने व २१२ आरोग्य केंद्रे सुसज्ज ठेवण्यात आले आहेत.
 कोरोना चाचणी वाढविणार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पालिकेने, जम्बो कोरोना सेंटर व इतर मोठ्या रुग्णालयांसोबत खासगी रुग्णालयांना सुद्धा अलर्ट केले आहे. गरज पडल्यास कोरोना चाचण्यांची संख्या ८ हजारावरून २५ हजारांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले.