घरमुंबईBMC Unlock Guideline: लोकल सर्वसामान्यांसाठी बंद की सुरू? मुंबई महापालिकेची अनलॅाक नियमावली...

BMC Unlock Guideline: लोकल सर्वसामान्यांसाठी बंद की सुरू? मुंबई महापालिकेची अनलॅाक नियमावली जारी

Subscribe

राज्य सरकारने काढलेल्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेचा दोन आठवड्यांचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट साडेपाच टक्क्यांवर आहे. तर, सरासरी ऑक्सिजन बेड ३२ ते ३४ टक्क्यांपर्यंत व्यापलेले आहेत. या आकडेवारीनुसार मुंबई महापालिका लेव्हल ३ मध्ये असल्याचे सांगितले गेले. यानुसार मुंबई महापालिकेने अनलॅाकची नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या गाईडलाईनद्वारे मुबंई लेवल तीनमध्ये आहे. मुंबईचा आताचा पॉझिटिव्हिटी रेट ५.३० टक्के असल्याने येत्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेटमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई लोकलचा प्रवास सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, सर्वसामान्य नागरिकांना लोकलसाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. सध्या तरी लोकल सर्वसामान्यांसाठी बंदच राहणार आहे. आधीच्या गाईडलाईनप्रमाणे केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना लोकल प्रवासास परवानगी असणार आहे.

  • “ब्रेक-द-चेन” अंतर्गत कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी महानगरपालिकेद्वारे निर्बंध जारी

“ब्रेक-द-चेन” अंतर्गत राज्य शासनाने आदेश पारित केलेले आहेत. या आदेशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत कोव्हिड-१९ सकारात्मक दर ५.५६ % असून, ऑक्सिजन बेड व्याप्तीचा दर ३२.५१ % आहे. त्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत पुढील प्रमाणे आदेश लागू राहणार आहेत

- Advertisement -

१. राज्य शासनाच्या या आदेशातील लेवल ३ साठी उपनगरीय रेल्वे सेवेबाबतची तरतूद पुढील प्रमाणे आहे. “Restricted- for Medical, few essentials and women / DMA may put extra restriction”. यानुसार, मुंबई महानगरपालिका हद्दीसाठी लेवल ३ साठीच्या उपनगरीय रेल्वे सेवेबाबतच्या तरतूदीतील “and women” हा शब्द वगळता ही तरतुद पुढील “Restricted- for Medical, few essentials” अशी असणार आहे.

२. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत लेवल ३ चे सर्व निर्बंध जसेच्या तसे लागू राहणार आहेत. त्यामुळे बृहन्मुबंई महानगरपालिकेने “ब्रेक-द-चेन” मिशन अंतर्गत यापुर्वी जारी केलेले सर्व आदेश रद्द ठरणार आहे.

- Advertisement -

३. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे सर्व व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर व
इतर उपाययोजना अनिवार्य राहणार आहे.

४. नव्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

५. हे आदेश सोमवारी, ७ जून २०२१ पासुन लागू होणार आहे.

दरम्यान, राज्यातील लॉकडाऊन १५ जून पर्यंत वाढण्यात आला असला तरी राज्यात काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. त्याचबरोबर अनलॉकची प्रक्रिया पाच टप्प्यात सुरु करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र अनलॉकची प्रक्रिया कधीपासून सुरु होणार याबाबत राज्यात सावळा गोंधळ सुरु होता. मात्र शनिवारी पहाटे मुख्यमंत्री कार्यालयाकडून महाराष्ट्र अनलॉकच्या सविस्तर सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सोमवार ७ जून पासून राज्यात पाच टप्प्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रशासाकीय पातळीवर निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्सच्या उपलब्धतेनुसार पाच टप्प्यात निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -