घरमुंबईअनधिकृत पार्किंग केलेल्या खाजगी 'बसेस'ला पालिकेचा दणका

अनधिकृत पार्किंग केलेल्या खाजगी ‘बसेस’ला पालिकेचा दणका

Subscribe

मुंबई महापालिकेने अवजड वाहनांना पार्किंग सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, पालिकेने उपलब्ध करून दिलेल्या पार्किंग सुविधेचा यथायोग्य वापर होण्याऐवजी अवजड वाहनांचे चालक किंवा मालक हे त्यांच्या गाड्या अद्यापही अनधिकृतपणे रस्त्यांवर पार्क करित असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे महापालिकेने खाजगी 'बसेस' सह अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगवर अधिक तीव्र स्वरुपात दंडात्मक कारवाई केली.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अनेक रस्त्यांवर अनधिकृतपणे उभ्या करण्यात येणाऱ्या खाजगी ‘बसेस’, ट्रक यासारख्या अवजड वाहनांमुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा होऊन वाहतुकीचा वेग मंदावतो. ही बाब लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने बेस्टचे २४ डेपो आणि ३७ बस टर्मिनल, या ६१ ठिकाणी वाजवी दरात खाजगी बस, ट्रक इत्यादी अवजड वाहनांना पार्किंग सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र, या ६१ ठिकाणी असणाऱ्या पार्किंग सुविधांचा यथायोग्य वापर होण्याऐवजी अवजड वाहनांचे चालक किंवा मालक हे त्यांच्या गाड्या अद्यापही अनधिकृतपणे रस्त्यांवर पार्क करित असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे महापालिकेने खाजगी ‘बसेस’ सह अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगवर अधिक तीव्र स्वरुपात दंडात्मक कारवाई केली. यानुसार बुधवारी संध्याकाळी उशीरापर्यंत तब्बल ५२ ‘बसेस’ आणि १३ ट्रकवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईपोटी सुमारे ९ लाख रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. ज्यापैकी १ लाख ८० हजार रुपये एवढा दंड कालच वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा – मुंबई महापालिका आश्रय योजनेतंर्गत बांधणार १३ हजार ८८७ घरे

- Advertisement -

एका अवजड वाहनावर २३ हजार २५० रुपये एवढा कमाल दंड

मुंबईतल्या वाहतुकीला शिस्त लागण्यासह ती अधिक सुरळीत करण्याचा चंग महापालिकेने बांधला आहे. यासाठी एकाच वेळी वेगवेगळ्या स्तरावर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या महापालिकेने रस्त्यांवर अनधिकृतपणे ‘पार्क’ करण्यात येणाऱ्या आणि वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या गाड्यांबाबत कठोर भूमिका यापूर्वीच घेतली आहे. त्यानुसारच अवजड वाहनांच्या अनधिकृत पार्किंगसाठी रुपये १० हजार दंड, तर टोचन शुल्क म्हणून ५ हजार रुपये; याप्रमाणे एकूण १५ हजार रुपये एवढ्या रकमेची आकारणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर ज्या दिवशी बस किंवा ट्रक टोचन करण्यात येईल, त्याच दिवशी वाहनचालक किंवा मालक यांनी ती गाडी सोडवून न नेल्यास प्रतीदिवस रुपये २७५ एवढा विलंब आकार देखील वसूल केला जात आहे. ही दंड आकारणी कमाल ३० दिवसांपर्यंत होणार आहे. यानुसार एका अवजड वाहनावर २३ हजार २५० रुपये एवढा कमाल दंड आकारला जात आहे.

हेही वाचा – मुंबई महापालिका स्थायी समितीचे अधिकार कमी करणार!

- Advertisement -

५२ बस आणि १३ ट्रकवर कारवाई

दरम्यान, बुधवारी संध्याकाळी उशीरापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईत ५२ बस आणि १३ ट्रकवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ‘जी दक्षिण’ विभागात सर्वाधिक म्हणजे ११ अवजड वाहनांवर, त्यानंतर ‘के पूर्व’ विभागात १० वाहनांवर आणि ‘एन’ विभागात ७ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील वाहतूक अधिक सुरळीत आणि वेगवान व्हावी, या प्रमुख उद्देशाने ७ जुलैपासून महापालिकेने मुंबई पोलीसांच्या सहकार्याने अनधिकृत पार्किंगवर कठोर कारवाई सुरु केली आहे. याच अनुषंगाने २४ बेस्ट डेपो आणि ३७ बस टर्मिनल येथे कमाल ३ हजार ४९५ एवढ्या संख्येने बसगाड्या पार्क करण्याच्या ‘जागा’ असून तेथे अत्यंत माफक दरात वाहनतळाची सुविधा यापूर्वीच उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी बस पार्किंगसाठी ‘मासिक पास’ सुविधा देखील वाजवी दरात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त महापालिकेच्या सार्वजनिक वाहनतळांवर देखील बसेस पार्क करण्याची सशुल्क सुविधा उपलब्ध आहे.

हेही वाचा – मुंबई महापालिका हॉस्पिटल्समधील औषध पुरवठा आजपासून बंद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -