घरताज्या घडामोडीCruise Drugs Case: WhatsApp चॅटमध्ये सहभागी २४ वर्षीय ड्रग्ज पेडलरला NCBने घेतलं...

Cruise Drugs Case: WhatsApp चॅटमध्ये सहभागी २४ वर्षीय ड्रग्ज पेडलरला NCBने घेतलं ताब्यात

Subscribe

२ ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणासंदर्भात एनसीबी अजूनही ठिकठिकाणी कारवाया करत आहे. काल, गुरुवारी उशिरा रात्री एनसीबीने कारवाई करून एका २४ वर्षीय ड्रग्ज पेडलरला ताब्यात घेतले आहे. या ड्रग्ज पेडलरचं नाव ड्रग्ज संबंधित चॅटमधून समोर आलं. त्यामुळे हा पेडलर याप्रकरणातील प्रमुख संशयित आरोप असल्याची माहिती एनसीबीकडून देण्यात आली आहे. सध्या एनसीबी आर्यन खानसह इतरांना जामीन न मिळण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच आज पुन्हा एनसीबीकडून बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी होणार आहे. (Mumbai NCB detained a 24-year-old drug peddler late last night)

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर येत्या मंगळवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे सध्या एनसीबी हायकोर्टात आणखीन ठोस बाजू मांडण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बुधवारी एनसीबीने कोर्टात दाखल केलेल्या आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये एका बॉलिवूडच्या नवोदित अभिनेत्रीचं नाव असल्याचे समोर आलं होत. त्यानंतर गुरुवारी ही अभिनेत्री कोण आहे, याचा खुलासा झाला. बॉलिवूडमधील नवोदित अभिनेत्री अनन्या पांडे हिच नाव आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये आढळले. यात ड्रग्ज संबंधित बातचित केल्यामुळे अनन्याला एनसीबीने समन्स बजावून चौकशीसाठी हजर राहायला सांगितले. काल अनन्याची एनसीबीकडून २ तास चौकशी केल्यानंतर आजही तिची चौकशी केली जाणार आहे. आज सकाळी ११ वाजता एनसीबीकडून अनन्याची चौकशी होणार आहे.

- Advertisement -

त्यापूर्वीच एनसीबीने आर्यन आणि अनन्याच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये नाव असलेल्या आणखीन एका व्यक्तीवर कारवाई केली आहे. काल रात्री एनसीबीने या व्यक्तीवर कारवाई केली. हा व्यक्ती २४ वर्षीय ड्रग्ज पेडलर असून याप्रकरणातील प्रमुख संशयित असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – Drugs Case: Ananya Panday ची गुरुवारी दोन तास चौकशी, आज पुन्हा NCB करणार चौकशी

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -