घरताज्या घडामोडीNCB Raid: मला VIP गेस्ट म्हणून बोलावलं होतं, ड्रग्ज प्रकरणात 'आर्यन खानचा'...

NCB Raid: मला VIP गेस्ट म्हणून बोलावलं होतं, ड्रग्ज प्रकरणात ‘आर्यन खानचा’ मोठा खुलासा

Subscribe

माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलवण्यात आले

शनिवारी रात्री उशिरा एनसीबीकडून (NCB) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका शिपमधील ड्रग्ज पार्टीवर धाड टाकण्यात आली. शिपवरुन मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले. यात मोठ्या प्रमाणात कोकेन आणि एमडी जप्त करण्यात आली आहे. एका बॉलिवूड सुपरस्टार शहारुख खानचा मुलगा आर्यन खानसह १० जणांना या ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने ताब्यात घेतले आहे. आर्यन खान सध्या एनसीबीकडून चौकशी सुरू असून दरम्यान त्याने ड्रग्ज प्रकरणात मोठा खुलासा केला आहे. एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, आर्यन खानने ‘मला व्हिआयपी गेस्ट म्हणून पार्टीला बोलावण्यात आले होते. पार्टीसाठी माझ्याकडून कोणतीही फी घेतली नाही. माझ्या नावाचा वापर करुन बाकीच्यांना बोलवण्यात आले’,  असल्याचा खुलासा केला आहे. एनसीबीकडून आर्यन खानची चौकशी सुरू असून या चौकशीदरम्यान काय माहिती समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीकडून तब्बल सात तास ऑपरेशन सुरू होते. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या शिपमध्ये ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती मिळताच  एनसीबीचे अधिकारी शिपवर प्रवास करत होते. शिप समुद्राच्या मध्यावर जाताच एनसीबीच्या पथकाने कारवाई केली. अनेक आरोपींना एनसीबीने रंगे हात पकडून त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले. रविवारी सकाळी त्यांना मुंबईत आणण्यात आले.

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेतेचा शहारुख खानचा मुलगा आर्यन खानसह १० आरोपींना एनसीबीने ताब्यात घेतले आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच शिपची ओपनिंग झाली होती. यावेळी मोठी पार्टी करण्यात आली त्या पार्टीला अनेक सेलिब्रेटींनी परफॉर्मन्स केला होता.


हेही वाचा – NCBची मोठी कारवाई; शिपवरील ड्रग्स पार्टीवर एनसीबीची धाड; बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलासह १० जण ताब्यात

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -