भारतातील ब्लॅक कोकेन सप्लायचे पहिले रॅकेट उघड; एनसीबीने मुंबईतून जप्त केला 3 कोटींचा साठा

mumbai ncb seizes black cocaine worth rs 3 crore being supplied from mumbai to goa

भारतात छुप्या पद्धतीने सुरु असलेले ड्रग्ज रॅकेट उद्धस्त करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) कंबर कसली आहे. यात एनसीबीला भारतातील ब्लॅक कोकेन सप्लायचे पहिले रॅकेट उद्धस्त करण्यात यश आलं आहे. एनसीबीच्या मुंबई झोनने मोठ्या प्रमाणात ब्लॅक कोकेन जप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तीन किलोपेक्षा वजनाच्या या ब्लॅक कोकेनची किंमत अंदाजे तीन कोटी रुपये आहे. ब्लॅक कोकेन जप्त करण्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे.

एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर अमित गवते यांच्या मते, ब्लॅक कोकेन रॅकेट पकडणे खूप कठीण आहे. कारण या कोकेनचा वास स्निफर डॉगला पकडता येत नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे सामान्य कोकेनमध्ये वास असको. पण ब्लॅक कोकेनला अजिबात वास येत नाही. त्यामुळे ते पकडणे फार कठीण आहे. भारतात प्रथमच ब्लॅक कोकेनची तस्करी झाली आहे.

एनसीबी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एनसीबीला या ब्लॅक कोकेनच्या पिन पॉइंटची माहिती मिळाली होती. हे कोकेन मुंबईहून गोव्याला पुठवठा केले जाणार होते. मात्र त्यापूर्वीच एनसीबीने कारवाई करत ते जप्त केले. एनसीबीकडून अद्यापही या प्रकरणी कारवाई सुरु आहे.

एनसीबीने अधिकृत ट्विटर हँडलद्वारे ट्विट करत म्हटले की, ब्युरोने ब्राझीलहून येणारे 3.20 किलो फायक्वालिटी ब्लॅक कोकेन जप्त केले आहे. हे सर्व सर्च ऑपरेशनअंतर्गत शक्य झाले आहे. याप्रकरणी देशातील विविध शहरांमधील ड्रग्स सप्लायर आणि रिसीव्हरला अटक केली आहे.


UPSC उमेदवारांसाठी खूशखबर; आता ‘या’ अॅपमधून मिळणार भरती आणि परीक्षेसंदर्भात प्रत्येक माहिती