घरमुंबईमुंबईला वाढत्या लोकसंख्येनुसार जादा पाणीपुरवठा आवश्यक, महापालिकेचे मत

मुंबईला वाढत्या लोकसंख्येनुसार जादा पाणीपुरवठा आवश्यक, महापालिकेचे मत

Subscribe

मुंबई – मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणात उंच टॉवर उभे राहत आहेत. तर दुसरीकडे झोपड्याही उभ्या राहत आहेत. त्यामुळे लोकसंख्या वाढ झपाट्याने होत आहे. परिणामी उपलब्ध पाणीपुरवठा कमी पडत असून वाढी पाणीपुरवठा होण्यासाठी प्रस्तावित गारगाई, पिंजाळ व दमणगंगा यांसारखी नवीन जलस्रोत निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत पालिका जल अभियंता खत्याकडून व्यक्त करण्यात आले आहे.

मुंबईला सध्या प्रतिदिन ३,८५० दशलक्ष लिटर – 

- Advertisement -

इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. वास्तविक, मुंबईची सध्याची लोकसंख्या १ कोटी ३५ लाख एवढी आहे. तर मुंबईत दररोज मुंबई बाहेरून म्हणजे अगदी पुणे, कर्जत, खोपोली, शहापूर, कसारा, पालघर, विरार, पनवेल आदी परिसरातून नोकरी, रोजगारासाठी किमान ४० लाख लोक दररोज ये – जा करीत असतात.

एवढ्या लोकांची दररोजची तहान भागविणे व इतर कामांसाठी आवश्यक पाण्याची गरजही मुंबई महापालिका पूर्ण करते. मात्र तरीही दैनंदिन पाणीपुरवठ्यापैकी म्हणजे ३,८५० दशलक्ष लिटर पाण्यापैकी २७ टक्के इतके पाणी हे चोरी व पाणी गळतीपोटी वाया जाते. त्यामुळे मुंबईकरांना बाराही महिने पाण्याची समस्या कमी – अधिक प्रमाणात भेडसावत असते. त्यातच मुंबईत सध्या २ हजार इमारती, बंगलो आदींची बांधकामे सुरू असून त्यासाठी मोठया प्रमाणात पाण्याचा वापर करण्यात येतो. तसेच, इतर कामांसाठीहो पिण्याच्या पाण्याचा अधिकाधिक वापर करण्यात येतो. त्यामुळे त्यामुळे मुंबईकरांना पाण्याची समस्या भेडसावत असते.

- Advertisement -

मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता मुंबईकरांसाठी सध्या किमान ५,००० दशलक्ष लिटर इतकी आहे. मात्र प्रत्यक्षात मुंबईला प्रतिदिन ३,८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा होत असल्याने सध्या आणखीन किमान १ हजार दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मुंबईला प्रस्तावित व अद्यापही रखडलेल्या गारगाई, दमणगंगा व पिंजाळ या नवीन जलस्तोत्राला चालना देणे गरजेचे आहे.

मुंबईला दररोज सात तलावांतून होणारा पाणीपुरवठा – 

तानसा तलावामधून दररोज ४५५ द.ल.लि

मोडक सागर – ४५५ द.ल.लि.

मध्य वैतरणामधून – ४५५ द.ल.लि.

अप्पर वैतरणा – ६४० द.ल.लि.

भातसामधून – २०२० द.ल.लि.

विहारमधून – ९० द.ल.लि.

तुळशीमधून – १८ द.ल.लि.

मुंबई महापालिका ठाणे, भिवंडी व निजामपूर महापालिकेलाही दररोज १५० दशलक्ष लिटर इतका वेगळा पाणीपुरवठा करते.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -