HomeमुंबईMumbai News : मुंबईतील डेब्रिजच्या विल्हेवाटसाठी पालिकेकडून दोन हजार कोटीचा खर्च

Mumbai News : मुंबईतील डेब्रिजच्या विल्हेवाटसाठी पालिकेकडून दोन हजार कोटीचा खर्च

Subscribe

मुंबई महापालिकेला दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या भेडसावत होती. मात्र आता त्यावर पालिकेने उपाययोजना करून ती समस्या मार्गी लावत आहे. तर, दुसरीकडे पालिकेने दररोज उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या डेब्रिजची समस्या दूर करण्यासाठी कंत्राटदार नेमून दहिसर येथे डेब्रिजवर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू केला आहे.

मुंबई : मुंबई महापालिकेला दररोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याची समस्या भेडसावत होती. मात्र आता त्यावर पालिकेने उपाययोजना करून ती समस्या मार्गी लावत आहे. तर, दुसरीकडे पालिकेने दररोज उघड्यावर टाकण्यात येणाऱ्या डेब्रिजची समस्या दूर करण्यासाठी कंत्राटदार नेमून दहिसर येथे डेब्रिजवर प्रक्रिया करणारा प्रकल्प सुरू केला आहे. त्यावर दोन हजार कोटींचा खर्च करीत आहे. या प्रकल्पात दररोज मुंबईतील 600 टन डेब्रिजवर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यातून माती, रेती, पावडर, लहान – मोठे दगड, प्लास्टिक यांचे वर्गीकरण करून त्यांचा पुनर्वापर करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. (Mumbai News: 2000 crores spent by the municipality for the disposal of debris)

डेब्रिजपासून पेव्हर ब्लॉक, दगड, विटा, बसण्यासाठी बाकडे बनविण्यात येणार आहेत. डेब्रिज विल्हेवाट लावण्याबाबत महापालिकेच्या माध्यमातून दहिसर येथे पाच एकर जागेत सुरू करण्यात आलेला हा महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा डेब्रिज प्रकल्प आहे, असा दावा या प्रकल्पाचे व्यवस्थापन पाहणारे, उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (प्रभारी) किरण दिघावकर आणि कार्यकारी अभियंता नितीन परब यांनी सांगितले. तर, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने सन 2016 मध्ये बांधकाम कचऱ्याचे नियमन करण्यासाठी ‘बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापन नियम’ अंमलबजावणी सुरू केली आहे. या नियमांनुसार, ‘बांधकाम आणि पाडकाम कचरा’ याचा अर्थ कोणत्याही नागरी वास्तूच्या बांधकामातून, पुनर्रचनेतून, दुरुस्तीतून अथवा पाडकामातून निर्माण झालेला कचरा होय. त्‍यात बांधकामासाठी लागणारे साहित्य, राडारोडा आणि दगडविटा यांचा समावेश असतो. यामध्ये कचरा निर्माण करणाऱ्याची कर्तव्ये नमूद करण्‍यात आली आहेत. काँक्रिट, माती व अन्य माल जमा करणे आणि वेगळा करणे; तसेच अन्य माल व निर्माण झालेला बांधकाम आणि पाडकाम कचरा साठवणे यांचा समावेश आहे.

- Advertisement -

हेही वाचा… BJP : मुंबईतील उर्दू लर्निंग सेंटर बंद करण्याची विधानसभेत मागणी; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला असा आरोप

डेब्रिज समस्येने महापालिका हैराण

मुंबईत रस्ते, पदपथ, मोकळ्या जागेत कुठेही कोणीही घरातील, बंगला, इमारतीचे डेब्रिज उघड्यावर टाकून देतात. त्यामुळे रस्त्यावर धूळ उडते. कचऱ्यात भर पडते. या डेब्रिजबाबत नागरिकांकडून दररोज येणाऱ्या तक्रारींमुळे महापालिकेची डोकेदुखी वाढली होती. महापालिका गेल्या काही वर्षांपासून उघड्यावरील डेब्रिज उचलून देवनार डंपिंग ग्राउंडवर टाकत होती. मात्र या डेब्रिजच्या समस्येवर तोडगा सापडत नव्हता.

- Advertisement -

अखेर डेब्रिजची समस्या निकाली

महापालिकेने अखेर डेब्रिजची विल्हेवाट लावण्यासाठी रामबाण तोडगा काढला आहे. सद्या पश्चिम उपनगरातील डेब्रिज संकलित करून ते दहिसर, कोंकणी पाडा येथील पाच एकर जागेत दररोज किमान 600 टन डेब्रिजवर प्रक्रिया करणारा प्रकल्प नुकताच सुरू केला आहे. कोकणीपाडा – दहिसर येथे पाच एकर जागेवर उभारलेल्‍या या प्रकल्पाची प्रतिदिन प्रक्रिया क्षमता 600 टन इतकी आहे. वांद्रे ते दहिसर या पश्चिम उपनगरांत निर्माण होणाऱ्या डेब्रिजवर या प्रकल्‍पात पुनर्प्रक्रिया केली जात आहे. या प्रकल्‍प अंतर्गत प्राथमिक चाचणीसाठी 14 ऑगस्‍टपासून डेब्रिज संकलन सुरु करण्यात आले. तर 4 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -