घरमुंबईMumbai News : वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची डीजीसीएने घेतली दखल; मागवला अहवाल

Mumbai News : वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची डीजीसीएने घेतली दखल; मागवला अहवाल

Subscribe

वृद्ध व्यक्तीने स्वत:साठी आणि पत्नीसाठी दोन व्हीलचेअरची विनंती केली होती. पण एअर डंडियानकडून फक्त एकच व्हीलचेअर देण्यात आली होती.

मुंबई : मुंबई विमानतळावर एका वृद्ध व्यक्तीला व्हीलचेअर न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घडली होती. एअर इंडिया विमानाने न्यूयॉर्कहून मुंबईत आलेल्या 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीला विमान कंपनीकडून व्हीलचेअर न दिल्यामुळे त्याना चालत जावे लागेल आणि यामुळे त्या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या घटनेचा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) 80 वर्षीय एअर इंडिया प्रवाशाच्या मृत्यूचा अहवाल मागवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीने स्वत:साठी आणि पत्नीसाठी दोन व्हीलचेअरची विनंती केली होती. पण एअर डंडियानकडून फक्त एकच व्हीलचेअर देण्यात आली होती. यानंतर वृद्ध व्यक्तीला चालत जावे लागल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. कारण टर्मिनलच्या आतील इमिग्रेशन काउंटरपर्यंत ते वृद्ध जवळपास 15. किलोमीटर चालत गेले आणि ते इमिग्रेशन काउंटरपर्यंत चालत गेल्यानंतर ते तिथे कोसळले. यानंतर वृद्ध व्यक्तीला विलेपार्लेला नानावटी रुग्णालयात नेहण्यात आल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : ओबीसीतून आरक्षणाच्या अधिसूचनेची अंमलबजावणी व्हावी- मनोज जरांगे

एनएचआरसीने डीजीसीएला नोटीस बजावून चार आठवड्यातून या घटनेचा तपशीलावर अहवाल मागवला आहे. यात मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई द्यावी. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पावले उचलवावीत.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : आरक्षण टिकले तर मुख्यमंत्र्यांची खुर्ची टिकते; महाराष्ट्राचा हाच आहे इतिहास

धक्कदायक घटना 12 फेब्रुवारी रोजी घडली

वृद्ध व्यक्ती हा पत्नीसोबत 12 फेब्रुवारी रोजी न्यूयॉर्कहून मुंबईत पोहोचले होते. यावेळी दाम्पत्याने विमान कंपन्यांकडे व्हीलचेअरची मागणी केली होती. पण कंपनीकडे एकच व्हीलचेअर होती आणि त्यांनी दाम्पत्यांना थोडा वेळ थांबण्याची विनंती केली होती. पण 80 वर्षीय व्यक्तीने पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे ही दुर्दैवी घटना घडली असून आम्ही या कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत, अशी माहिती एअर इंडियांच्या प्रवक्त्याने दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -