घरमुंबईMumbai News : फायर ऑडिट न केल्यास..., अग्निशमन दलाकडून मुंबईकरांना 'हा' इशारा

Mumbai News : फायर ऑडिट न केल्यास…, अग्निशमन दलाकडून मुंबईकरांना ‘हा’ इशारा

Subscribe

मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबई आणि मुंबई उपनगरात आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. आगीच्या घटनांमध्ये अनेकांचे संसार रस्त्यावर आलेले आहेत. ज्यामुळे मुंबईतील आगीच्या घटनांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आता अग्निशमन दलाने उंच इमारतींना जानेवारी आणि जुलै महिन्यात असे वर्षातून दोनदा फायर ऑडिट अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. तसेच  फायर ऑडिट न झाल्यास 10 दिवसांच्या आत पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा दिला आहे. (Mumbai News Fire audit not done fire brigade warns Mumbaikars)

हेही वाचा – Maharashtra Politics : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसला ‘या’ व्यक्तीवरही शाश्वती नाही

- Advertisement -

मुंबईतील आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी अग्निशमन दल आता एक्शन मोडमध्ये आले आहे. अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आता उंच इमारतींना जानेवारी आणि जुलै महिन्यात असे वर्षातून दोनदा फायर ऑडिट अहवाल सादर करणे बंधनकारक असणार आहे. कारण अग्निशमन दलाचे पथक अशा इमारतींना अचानक भेटी देतील आणि इमारतींचे फायर ऑडिट झाले नसेल तर त्यांचा पुढील 10 दिवसांच्या आत पाणी आणि वीज कनेक्शन तोडण्यात येणार आहे. कारण गेल्या वर्षी मुंबईत अग्निशमन दलाला 15 हजार कॉल्स आले होते, त्यापैकी तब्बल 5074 कॉल हे आगीसंदर्भात होते, अशी माहिती अधिकाऱ्यने दिली आहे.

अधिकाऱ्याने सांगितले की, इशारे देऊनही सोसायटी आणि उंच इमारतींमध्ये अग्निसुरक्षा नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसून येते. त्यामुळे प्रत्येक प्रभागात मोठ्या इमारतींची यादी तयार करण्यात येते आहे. जानेवारी आणि जुलैमध्ये फायर ऑडिट न केलेल्या इमारतींची यादी पाहिल्यानंतर अशा इमारतींची तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक प्रभागात तपासणी करण्यासाठी पथक तयार करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : नांदेड हा काँग्रेसचाच बालेकिल्ला, कुठल्या…; पटोलेंची टीका

इलेक्ट्रिकल ऑडिट अनिवार्य

अग्निशमन दलाकडे सध्या 90 मीटर उंचीपर्यंत पोहोचणाऱ्या शिड्या आहेत. त्यांच्या मदतीने 100 मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींमध्ये लागलेली आग विझवणे शक्य होते. मात्र उंच इमारतींमधील आग विझवणे नेहमी आव्हान असते. त्यामुळे अशा इमारतींमध्ये स्प्रिंकलर बसवणे अग्निशमन दलाकडून बंधनकारक करण्यात आले आहे. याचसंदर्भात माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, इमारतींमध्ये 80 टक्के शॉर्ट सर्किटच्या घटना घडतात, त्यामुळे सोसायट्या आणि मोठ्या इमारतींमध्येही इलेक्ट्रिकल ऑडिट अनिवार्य करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -