घरमुंबईMumbai News : गोवंडी-मानखुर्द बनत आहे नरक; दररोज 100 हून अधिक टीबी-कॅन्सरचे...

Mumbai News : गोवंडी-मानखुर्द बनत आहे नरक; दररोज 100 हून अधिक टीबी-कॅन्सरचे रुग्ण!

Subscribe

मुंबई : वाढते प्रदूषण लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने खबरदारी घेतली आहे. मात्र खराब हवेचा मुंबईकरांच्या आरोग्यावर देखली परिणात होत असल्याचे दिसून येत आहे. अशातच धक्कादायक माहिती समोर येत आहे. ती म्हणजे उत्तर भारतीय अल्पसंख्याक बहुल गोवंडी-मानखुर्द परिसरातील हवा दिवसेंदिवस विषारी होत आहे. हवेच्या घसरलेल्या गुणवत्ता पातळीमुळे आधीच फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या समस्या आणखीच वाढल्या आहेत. त्यामुळे दररोज गोवंडी-मानखुर्द परिसरात 100 हून अधिक टीबी-कॅन्सरचे रुग्ण मिळत असल्याची माहिती मिळत आहे. (Mumbai News Govandi Mankhurd is becoming hell More than 100 TB Cancer patients every day)

हेही वाचा – Baramati : हर्षवर्धन पाटील यांच्या दोन्ही मुलांकडून इशारा; अजित पवार-पाटील संघर्ष पेटणार?

- Advertisement -

मुंबईतील पॉश भागातील हवेचा दर्जा ‘चांगला’ ते ‘मध्यम’ श्रेणी सुधारण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिका प्रशासन विविध योजना राबवत आहे, मात्र गोवंडी-मानखुर्द परिसरातील हवेचा दर्जा ‘खराब’ वरून ‘अतिशय निकृष्ट’ श्रेणी झाली आहे. आशियातील दुसरी सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या गोवंडी-मानखुर्द परिसराला प्रदूषणाने व्यापले आहे. या ठिकाणी टीबी, कॅन्सर, श्वसन आणि दम्याचे जवळपास 30 ते 50 टक्क्यांनी रुग्ण वाढले आहेत. तर दररोज 100 हून अधिक महिला, वृद्ध आणि लहान मुले टीबी-कर्करोगाला बळी पडताना दिसत आहेत. 17 लाख लोकसंख्या असलेल्या गोवंडी-मानखुर्द झोपडपट्टीतील लोकांना गेल्या दहा वर्षांपासून ‘घाणेरडे पाणी, हवा आणि गुदमरणाऱ्या विषारी धुरात’ गुदमरून जीवन जगावे लागत आहे. देवनार डम्पिंग थांबले असले तरी त्याठिकाणी वाढते प्रदूषण काही केल्या थांबताना दिसत नाही.

एसएमएस हे घातक प्रदूषणाचे खरे कारण 

गोवंडी येथील बायोमेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांट (SMS) कंपनीतून निघणारा धूर नागरिकांसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. परंतु शासन व महापालिका प्रशासनाने याकडे कधीच लक्ष दिलेले नाही. मागे एकदा खासगी संस्थांनी न्यायालयात धाव घेतल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने एसएमएस कंपनी हटवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र कंपनी हटवण्यासाठी एक वर्षाहून अधिक कालावधी लागणार आहे. मात्र तोपर्यंत या प्रदूषणामुळे होणाऱ्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : रितेशचे काका-पुतण्याच्या नात्यावर भाष्य; अजित पवारांना लगावला टोला?

गोवंडी-मानखुर्द परिसरात सरकारी रुग्णालय नाही

गोवंडी-मानखुर्द परिसरातील वायूप्रदूषणाचा सर्वात मोठा परिणाम शाळकरी मुले, वृद्ध आणि महिलांवर होत आहे. दररोज हजारो नागरिक टीबी आणि कॅन्सरसारख्या घातक आजारांना बळी पडताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे या परिसरात एकही मोठे सरकारी रुग्णालय नाही आणि छोट्या रुग्णालयांमध्ये योग्य त्या सुविधा नाहीत. त्यामुळे लोकांकडे उपचाराविना मरण्याची वेळ आली आहे. कारण नगरसेवक, स्थानिक आमदार आणि खासदार या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत. त्यामुळे जगायचे कसे? असा प्रश्न त्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -