Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर मुंबई जॉगिंग करताना कार अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याने जॉगर्स ग्रुप आक्रमक, पोलिसांना घातला...

जॉगिंग करताना कार अपघातात महिलेचा मृत्यू झाल्याने जॉगर्स ग्रुप आक्रमक, पोलिसांना घातला घेराव

Subscribe

या अपघातातील कार चालकावर भारतीय दंड विधानाच्या (IPC) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत रविवारी सकाळी वरळी-वांद्रे सीलिंकपासून काही मीटर अंतरावर असलेल्या वरळी सीफेसवरील जॉगिंग करणाऱ्या एका महिलेचा वेगवान एसयूव्हीने धडक दिल्याने मृत्यू झाला. त्यानंतर जॉगर्स ग्रूप आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलाय. परंतू आंदोलन होण्यापूर्वीच जॉगर्स ग्रूपचे सदस्य आणि पोलिसांमध्ये तणावाचं वातावरण दिसून आलं.

वरळी-वांद्रे सीलिंकपासून काही मीटर अंतरावर असलेल्या वरळी सीफेसवर जॉगिंग करण्यासाठी आलेल्या राजलक्ष्मी रामकृष्णन यांना एका कारने उडवलं. वरळी डेअरीजवळ सकाळी साडेसहा वाजता हा अपघात घडला. त्या एका टेक कंपनीच्या सीईओ होत्या. तसंच त्या फिटनेस फ्रीक असून शिवाजी पार्कमधील जॉगर्स ग्रुपमध्ये त्या सक्रिय होत्या. या अपघातात कार चालक सुद्धा जखमी झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय. तो एका खासगी कंपनीत काम करत असून मुंबईतील ताडदेव परिसरात राहणारा आहे. पोलीस सध्या त्याच्याकडे चौकशी करत असून या घटनेनं जॉगर्स ग्रूपचे सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय.

- Advertisement -

दादरच्या शिवाजी पार्क ते वरळी पोलीस स्टेशनपर्यंत हे जॉगर्स ग्रूपचे सदस्य मोर्चा काढणार आहेत. हे कळल्यानंतर वरळी पोलीस शिवाजी पार्क परिसरात आंदोलकांना कारवाईबाबत माहिती देण्यासाठी आले होते. त्यावेळी या घटनेने संतापलेल्या आंदोलकांनी पोलिसांना घेराव घातला. काही काळ इथलं वातावरण तापलेलं होतं.

या अपघातातील कार चालकावर भारतीय दंड विधानाच्या (IPC) विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात मोटार वाहन कायद्याचे कलम 184 अंतर्गत बेदरकारपणे वाहन चालवणे आणि आयपीसीच्या 304 अ अंतर्गत निष्काळजीपणामुळे मृत्यू ओढवणे या कलमांचा समावेश आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -