Maharashtra Assembly Election 2024
घरमुंबईMumbai News : छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातील भुयारी मार्गात अद्ययावत वायूविजन प्रणाली

Mumbai News : छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातील भुयारी मार्गात अद्ययावत वायूविजन प्रणाली

Subscribe

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगतच्या भूयारी मार्गामध्ये हवा खेळती राहण्यासाठी वायूविजन (व्हेंटिलेशन) प्रणाली नव्या तंत्रज्ञानासह अंमलात येत आहे. भूयारी मार्गातील हवा खेळती राहण्यासोबतच तापमान कमी होण्यासाठी नव्या वायूविजन प्रणालीमुळे मदत होणार आहे.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगतच्या भुयारी मार्गामध्ये हवा खेळती राहण्यासाठी वायूविजन (व्हेंटिलेशन) प्रणाली नव्या तंत्रज्ञानासह अंमलात येत आहे. भुयारी मार्गातील हवा खेळती राहण्यासोबतच तापमान कमी होण्यासाठी नव्या वायूविजन प्रणालीमुळे मदत होणार आहे. परिणामी, भुयारी मार्गाच्या ठिकाणी गर्दी असताना होणारी अस्वस्थतता कमी होण्यासाठी मदत होईल. त्यासोबतच भुयारी मार्गातील गरम हवा बाहेर टाकण्याचे काम मध्यवर्ती यंत्रणेमार्फत करण्यात येईल. त्यामुळे या भुयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या पादचारी, रेल्वे प्रवासी यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Mumbai News ventilation system in the underpass at Chhatrapati Shivaji Maharaj station)

मुंबईत दररोज 40 लाख लोक नोकरी, धंदा, व्यवसाय आणि इतर कामांसाठी ये-जा करीत असतात. ठाणे, पुणे, पनवेल, कर्जत, कसारा, कल्याण, भिवंडी आदी वाशी, रायगड आदी भागातून मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येतात. पुन्हा सायंकाळी येथूनच घरी परततात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकालगतच्या भुयारी मार्गामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. भुयारी मार्गाच्या ठिकाणी खेळती हवा रहावी, यासाठी प्रणाली अस्तित्वात आहे. असे असले तरी याअनुषंगाने भुयारी मार्गाचा होणारा आत्यंतिक वापर पाहता आधुनिक व अद्ययावत उपाययोजना करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले होते. त्यानुसार अधिक क्षमतेचे वायूविजन आणि हवा खेळती राहील याअनुषंगाने अद्ययावत प्रणाली संपूर्ण भुयारी मार्ग परिसरात अंमलात आणण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा… Mumbai Water Cut : मुंबईत 2 दिवस या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार; वाचा सविस्तर…

भुयारी मार्गाच्या ठिकाणी अद्ययावत वायूविजन प्रणालीअंतर्गत एकूण 9 जेट पंखे (फॅन्स) संपूर्ण भूयारी मार्ग परिसरात लावण्यात येत आहेत. या जेट पंख्यांमुळे भुयारी मार्गाच्या प्रवेशाच्या ठिकाणची हवा आतमध्ये वेगाने आणण्यासाठी मदत होईल. तसेच 2 अधिक क्षमतेचे पंखे मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात येत आहेत. या दोन पंख्यांमुळे मध्यवर्ती ठिकाणी भुयारी मार्ग परिसरातील हवा बाहेर टाकण्यासाठी मदत होणार आहे. तसेच संपूर्ण परिसरात हवा खेळती रहावी, यासाठी एखाद्या बोगद्यात ज्या पद्धतीने वायूविजन प्रणाली वापरली जाते, त्यानुसारच या भुयारी मार्गाच्या ठिकाणीही या प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.


Edited By Poonam Khadtale

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -