घरताज्या घडामोडीमुंबईतल्या नाईट क्लबमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन; पालिकेची कारवाई

मुंबईतल्या नाईट क्लबमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन; पालिकेची कारवाई

Subscribe

मुंबईतल्या नाईट क्लबमध्ये पुन्हा एकदा नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे.

मुंबईतून अद्यापही कोरोना गेलेला नसताना पालिकेने टाकलेल्या धाडीत परळ, वांद्रे येथे नाईट क्लबमध्ये दोन – अडीच हजार लोक विना मास्क आढळल्याची घटना समोर आली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा एकदा मुंबईतल्या नाईट क्लबमध्ये कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मुंबई महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे.

२७५ व्यक्ती विनामास्क

ख्रिसमस आणि नवीन वर्षाची चाहूल यामुळे मुंबईत पार्ट्या, एकत्र भेटणे, नाईट क्लबमध्ये जाणे या गोष्टींमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, सांताक्रूझ भागात असलेल्या बॉम्बे अड्डा या नाईट क्लबमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची बाब समोर आली आहे. बॉम्बे अड्डा या नाईट क्लबमध्ये पार्टी करणाऱ्या २७५ व्यक्तींनी मास्क घातलेला नव्हता. याप्रकरणी बॉम्बे अड्डा या नाईट क्लबला ३० हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

- Advertisement -

प्रीतम हॉटेलवर पालिकेची कारवाई

बॉम्बे अड्डा नाईट क्लबप्रमाणे दादरच्या प्रीतम हॉटेलवर देखील कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हॉटेला अचानक भेट दिली. त्यावेळी १२० जणांनी मास्क लावला नसल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे ज्यांनी कोरोनाचे नियम मोडले त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला आहे. प्रीतम हॉटेल पाठोपाठ भगवती हॉटेलवरही महापालिकेने कारवाई केली आहे.


हेही वाचा – नाईट क्लब, हॉटेल, पब पालिकेच्या रडारवर

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -