घरमुंबईTerrorist : मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, सुरक्षेसाठी उभारलं जाणार आता नवं मॉडल

Terrorist : मुंबई लोकल दहशतवाद्यांच्या टार्गेटवर, सुरक्षेसाठी उभारलं जाणार आता नवं मॉडल

Subscribe

दिल्लीत सहा दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर सर्वच तपास यंत्रणा आता अॅक्शन मोडमध्ये आल्या आहेत. या दहशतवाद्यांचा मुंबई, दिल्ली, उत्तरप्रदेशसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी मोठा घातपात घडवून आणण्याचा कट होता. या सहा अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी मुंबईतील धारावी परिसरत राहणारा आहे. यामुळे मुंबईत पुन्हा मोठा घातपात घडवण्यासाठी वेगाने प्लॅन सुरु होते. हा दहशतवादी मुंबई लोकलमधून प्रवास करुन दिल्लीला जात होता. यातून मुंबई लोकल पुन्हा दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती हे स्पष्ट होतेय. त्यामुळे लोकल सुरक्षेबाबत देखील हायअलर्ट देण्य़ात आला आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी (१६ सप्टेंबर) आरपीएफचे आयुक्त आयुक्त जितेंदर श्रीवास्तव, रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद आणि मध्य रेल्वेचे विभागीय संचालक शलभ गोयल यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली.

या बैठकीत मुंबई लोकलमधील महिलांच्या सुरक्षेसंदर्भात एक अॅक्शन प्लॅन तयार करण्यात आला. तसेच मुंबई लोकलच्या सुरक्षेसाठी एक नवीन मॉडेल उभारले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र मुंबई आणि दिल्लीसह विविध देशांमध्ये बॉम्बस्फोटांनी हादरवून जाणारा कट दिल्ली केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी उधळून टाकला आहे.

- Advertisement -

यातील मुंबईत राहणारा दहशतवादी जान मोहम्मद आणि त्याचा एक साथीदार टेंपल या ट्रेनमधून प्रवास करुन दिल्लीकडे घाईघाईने जात होते. मात्र तपास यंत्रणांनी त्याला ट्रेनमध्येच पकडले. पण त्याच्य़ा साथीदाराला पकडण्यात यश आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह सर्व सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे देशाला मोठ्या संकटातून वाचवण्यात यश आलेय.

दरम्यान दहशतवाद्यांनी मुंबई लोकलची रेकी केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने मध्य रेल्वेच्या मुख्यालयात मुंबईचे विभागीय संचालक आणि आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीदरम्यान लोकलची अतिरिक्त सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षेसाठी एक मॉडल तयार करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.

- Advertisement -

सध्या मुंबई लोकलमध्ये आणि स्थानकांवर बॉम्ब शोधक पथक, सीसीटीव्ही, बॅग स्कॅनर मशीन आणि रँडम चेकिंगद्वारे सुरक्षा देण्यात येत आहे. या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ केली जाईल. तसेच ही यंत्रणा अद्ययावत करण्यात येईल, असे जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले.


‘मिस्टर इंडिया’ बॉडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, सुसाइट नोटमध्ये साहिल खानचे नाव


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -