घरमुंबईMumbai : धारावी पुनर्विकास लांबणीवर नेण्याचा विरोधकांचा डाव; राहुल शेवाळेंचा ठाकरेंवर निशाणा

Mumbai : धारावी पुनर्विकास लांबणीवर नेण्याचा विरोधकांचा डाव; राहुल शेवाळेंचा ठाकरेंवर निशाणा

Subscribe

मुंबई : देशातील सर्वात मोठा धारावी पुनर्विकास प्रकल्प रखडवण्याचा विरोधकांचा डाव आहे. त्यासाठी विविध प्रकारचा अपप्रचार करून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा गंभीर आरोप शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांचे जाहीरपणे नाव न घेता केला आहे. चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Mumbai Oppositions plan to delay Dharavi redevelopment Rahul Shewale targets Uddhav Thackeray)

धारावी पुनर्विकास प्रकल्प यशस्वीरीत्या मार्गी लावण्यासाठी महायुती सरकार कटिबध्द आहे. धारावीकरांना अपेक्षित असलेल्या पुनर्विकासाला लवकरच सुरुवात होणार आहे. परंतु संक्रमण शिबिर, पर्यावरण, 500 चौ. फुटांचे घर अशा विविध विषयांवर अपप्रचार करून धारावीतील जनतेला पुनर्विकास प्रक्रियेपासून दूर नेण्याचा विरोधकांचा (शिवसेना उबाटा) डाव आहे, असा थेट आरोप राहुल शेवाळे यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Politics : रवी राणांच्या ‘त्या’ दाव्यावर खैरे म्हणतात, उद्धव ठाकरे एकवचनी नेता

केंद्र सरकारच्या अखत्यारीतील मुंबईतील मिठागराची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पातील अपात्र रहिवाशांसाठी राज्य सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय हा मुंबईच्या पर्यावरणासाठी धोकादायक आहे, असा आरोप विरोधक आणि काही पर्यावरणवाद्यांनी केला होता. मात्र, 2018 साली मंजूर झालेल्या मुंबई विकास आराखडा 2034 (डी.पी.) नुसार मिठागरांची ही जागा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील नसून यावर बांधकाम करण्यासाठी यापूर्वीच परवानग्या देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

राज्य सरकारच्यावतीने देखील इथे परवडणाऱ्या घरांचा प्रकल्प राबविला जात आहे. मुख्य म्हणजे हा विकास आराखडा 2018 मध्ये म्हणजे तत्कालीन शिवसेना-भाजपा सरकारच्या काळात मंजूर झाला आहे. त्यामुळे आता विरोध करणाऱ्यांनी तेव्हा या गोष्टीला का विरोध केला नाही? की आता केवळ धारावी पुनर्विकास प्रकल्प लांबणीवर नेण्यासाठी हा विरोध सुरू आहे? असा सवाल राहुल शेवाळे यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – NCP : महाराष्ट्राची परिस्थिती पाकिस्तानसारखी होतेय; सुप्रीम कोर्टाने टीप्पणी केल्याचा सुप्रिया सुळेंचा दावा

सर्व मिठागराच्या जमिनी या पूर्व द्रुतगती मार्गाच्या पश्चिम बाजूस आहेत. या भागात कोणतेही सीआरझेड निर्बंध, पाणथळ जागा अथवा खारफुटीचे जंगल नाही. तसेच, वडाळा येथील मिठागराच्या जागेवर केंद्र सरकारच्या कस्टम विभागाकडून त्यांच्या कार्यालय आणि कर्मचारी वसाहतीचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे पर्यावरण विषयक आरोपात काहीही तथ्य नाही, असेही राहुल शेवाळे यांनी स्पष्ट केले.

धारावीत लवकरच घरांचे सर्वेक्षण

धारावीत लवकरच घरांच्या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून धारावी पुनर्विकास प्रकल्पाकडे रहिवाशांची आणि इथल्या घरांची नेमकी माहिती गोळा होईल. तसेच, पुनर्विकास प्रक्रियेला वेग येऊ शकेल. त्यामुळे कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता धारावीतील जनतेने या सर्वेक्षणाला सहाय्य करावे, असे आवाहनही राहुल शेवाळे यांनी केले आहे.

हेही वाचा – Maratha Reservation : कायदा आला तर…; विशेष अधिवेशनाआधीच सदावर्तेंचा सरकारला इशारा

धारावीत सोशल- इकॉनॉमिक सर्वेक्षण करणार

धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशभरातील सगळ्यात मोठा आणि विशेष पुनर्विकास प्रकल्प आहे. त्यामुळे या पुनर्विकासात रहिवाशांचा ‘झोपडीतून नव्या घरात’ इतकाच विकास अपेक्षित नसून इथल्या प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी धारावीत सामाजिक आर्थिक सर्वेक्षण देखील करण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे. यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे धारावीतील विद्यार्थी, युवा, महिला, बेरोजगार यांसाठी शैक्षणिक, आर्थिक, स्वयंरोजगार, कौशल्यविकास यांसह अन्य संधी उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे. त्यामुळे धारावीत सोशल आणि इकॉनॉमिक सर्वेक्षण देखील करणार असल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

उद्धव ठाकरेंकडून अपप्रचार सुरू

उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना राहुल शेवाळे म्हणाले की, मिठागरांच्या जागेवर परवडणारी घरे बांधण्याचा निर्णय किंवा मेट्रो कारशेडसाठी खारफुटीच्या जमिनीची मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याच कार्यकाळात करण्यात आली होती. तसेच, मातोश्री ज्या ठिकाणी बांधण्यात आली तो परिसर देखील खारफुटी आणि दलदलीचा होता. तेव्हा पर्यावरणाचा विचार आला नाही. त्यामुळे केवळ धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध करण्यासाठीच उद्धव ठाकरे हा अपप्रचार करत असल्याची टीका राहुल शेवाळे यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -