घरमुंबईमुंबईच्या झोपडपट्टी परिसरात राबवणार 'कुष्ठरोग शोध मोहिम'!

मुंबईच्या झोपडपट्टी परिसरात राबवणार ‘कुष्ठरोग शोध मोहिम’!

Subscribe

कुष्ठरोगाच्या आजाराचे गांभिर्य लक्षात घेता आता मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. झोपडपट्टी परिसरात जाऊन कुष्ठरोग्यांना शोधून काढण्याची मोहिम पालिकेने हाती घेतली आहे.

कुष्ठरोग या आजाराचं समुळउच्चाटन व्हावं यासाठी पुन्हा एकदा पुढाकार घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर येत्या २५ सप्टेंबरपासून मुंबईतील झोपडपट्टी परिसरात ‘कुष्ठरोग शोध मोहिम’ राबवण्यात येणार आहे. जर एखाद्या व्यक्तीला कुष्ठरोग झाला असेल तर त्याचं लवकरात लवकर निदान होऊन त्यांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी ही मोहिम राबवण्यात येत आहे. खरंतर, कुष्ठरोग हा बरा होणारा आजार‌ आहे, त्यामुळे या आजाराविषयी कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नसल्याचं मत पालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी व्यक्त केलं आहे.

२५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर दरम्यान मोहिम

येत्या २५ सप्टेंबर ते १० ऑक्टोंबरपर्यंत ही मोहिम मुंबईच्या झोपडपट्टी परिसरात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत एकूण ४७ लाख १८ हजार ७०० लोकांची घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी २ हजार ९९६ सी. एच. व्ही. आणि स्वयंसेवक सर्वेक्षण टीम असणार आहेत. तसंच या टीममध्ये कुष्ठबाधित व्यक्तींचा देखील समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक टीम दरदिवशी २५ घरांचे सर्वेक्षण करणार आहे. शिवाय दोन कॉलेजमधील विद्यार्थ्यांना या मोहिमेत सहभागी केलं जाणार आहे. या मोहिमेसाठी ८४ लाख राज्य सरकारकडून आणि १८ लाख पालिकेकडून अनुदान देण्यात आलं आहे. मुंबई जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी ३७ लाख एवढी असून दर १० हजारांत कुष्ठरोगाचं प्रमाण ०.२२ टक्के इतकं आहे.

- Advertisement -

कुष्ठरोगाला शून्यावर नेण्याचा प्रयत्न

एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत आतापर्यंत १९५ कुष्ठरोग बाधित व्यक्ती आढळल्या आहेत. त्यामुळे जर गेल्या १० वर्षांची आकडेवारी पाहिली तर ही संख्या कमी झाली आहे. ती शून्यावर आणण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं डॉ. पद्मजा केसकर यांनी स्पष्ट केलं आहे.

गेल्या दहा वर्षांच्या आकडेवारी

  • २००८ – ०९ – ११३५ रुग्ण
  • २००९ – १० – १११५ रुग्ण
  • २०१०- ११ – ७९२ रुग्ण
  • २०११- १२ – ७०९ रुग्ण
  • २०१२- १३ – ७३९ रुग्ण
  • २०१३- १४ – ६२७ रुग्ण
  • २०१४-१५ – ५६५ रुग्ण
  • २०१५- १६ – ४७७ रुग्ण
  • २०१६- १७ – ४५७ रुग्ण
  • २०१७- १८ – ४३२ रुग्ण
Bhagyshree Bhuwadhttps://www.mymahanagar.com/author/bhagu/
भटकंती करायला खूप आवडतं. कोषात बसून राहणं अजिबात आवडत नाही. वडापाव प्रचंड आवडतो. जेवण तयार करण्याची आवड आहे. भरतनाट्यम शिकतेय. जीवनावर मनापासून प्रेम करते. नकार हा शब्द माझ्या शब्दकोशात नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -