घरCORONA UPDATEबायोमेट्रिकविरोधात सोमवारपासून आरोग्य कर्मचार्‍यांचे बेमुदत आंदोलन

बायोमेट्रिकविरोधात सोमवारपासून आरोग्य कर्मचार्‍यांचे बेमुदत आंदोलन

Subscribe

मुंबई महापालिकेने आरोग्य कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. पालिकेचा हा निर्णय कर्मचार्‍यांसाठी घातक आहे. त्यामुळे तातडीने बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्यात यावी, अन्यथा सोमवारपासून बेमुदत आंदोलन पुकारण्याचा इशारा कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग प्रसार होऊ नये यासाठी मार्चमध्ये सर्वच सरकारी व खासगी कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक हजेरी बंद केली होती. कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबईमध्ये सापडत असताना पालिकेने आरोग्य कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. पालिकेचा हा निर्णय कर्मचार्‍यांसाठी घातक आहे. त्यामुळे तातडीने बायोमेट्रिक हजेरी रद्द करण्यात यावी, अन्यथा सोमवारपासून बेमुदत आंदोलन पुकारण्याचा इशारा कर्मचारी संघटनेकडून देण्यात आला आहे.

मुंबई महापालिका आरोग्य आरोग्य खात्यात काम करणारे सर्व संवर्गातील कामगार, कर्मचारी, परिचारिका, अधिकारी व डॉक्टर्स आपल्या जीवाची पर्वा न करता मार्चपासून कोरोना बाधित रुग्णांची सेवा, शुश्रुषा करीत आहेत. अनेक कर्मचारी वाशिम, वाडा, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, वाशी, पनवेल, नवी मुंबई, वसई, विरार येथून प्रवास करून कामावर येत आहेत. या प्रवासात सोशल डिस्टसिंग पाळणेही मुश्लिक होत असताना हे कर्मचारी नियमित कामावर येऊन आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत. असे असतानाही पालिका आयुक्त इक्बलासिंग चहल यांनी आरोग्य खात्यातील कर्मचार्‍यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक केली आहे. बायोमेट्रिक हजेरी करताना संसर्ग होण्याचा धोका अधिक असल्याने केंद्र व राज्य सरकारने बायोमेट्रिक बंद केली होती. मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक असतानाही पालिका आयुक्त बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्याचा घातक निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात आरोग्य खात्यातील कर्मचार्‍यांनी बुधवारी केईएम, नायर, सायन या पालिकेच्या अधिष्ठात्यांना निवेदन देऊन हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली आहे. अन्यथा सोमवारपासून बेमुदत आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा म्युनिसिपल मजदूर युनियनकडून देण्यात आल्याची माहिती युनियनचे चिटणीस प्रदीप नारकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -