HomeमुंबईMumbai : मुंबईकरांनी रचला महागड्या कार खरेदीचा विक्रम, फेरारी ते लेम्बोर्गिनीची झाली...

Mumbai : मुंबईकरांनी रचला महागड्या कार खरेदीचा विक्रम, फेरारी ते लेम्बोर्गिनीची झाली विक्री

Subscribe

मुंबईच्या रस्त्यांवर हल्ली अनेक पॉश गाड्या पाहायला मिळत आहेत. कारण मुंबईतील श्रीमंत मंडळी आता अलिशान, पॉश आणि महागड्या असणाऱ्या वाहनांना पसंती देऊ लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे या आवडीमुळे सरत्या वर्षात मुंबईकरांनी महागड्या कार खरेदीचा विक्रम रचला आहे.

मुंबई : मुंबईच्या रस्त्यांवर हल्ली अनेक पॉश गाड्या पाहायला मिळत आहेत. कारण मुंबईतील श्रीमंत मंडळी आता अलिशान, पॉश आणि महागड्या असणाऱ्या वाहनांना पसंती देऊ लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे या आवडीमुळे सरत्या वर्षात मुंबईकरांनी महागड्या कार खरेदीचा विक्रम रचला आहे. 2024 मध्ये शेवटच्या काही दिवसांमध्ये 50 किंवा 100 नाही तर तब्बल 1400 महागड्या कारची विक्री करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये फेरारी, लेम्बोर्गिनी, ऑडी अशा महागड्या कारचा समावेश आहे. या कार खरेदीमुळे शासनाची मात्र चांदी झाली असून यामुळे सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळाला आहे. (Mumbai people set a record for buying expensive cars, from Ferrari to Lamborghini sold)

जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या काळात 1353 महागड्या आणि आलिशान कारची मुंबईकरांनी खरेदी केली आहे. या वाहनांची किंमत एक कोटीहून अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईत ताडदेव आरटीओमध्ये सर्वाधिक वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. बीएमडब्ल्यू या कंपनीच्या कारची सर्वाधिक खरेदी कार प्रेमी मुंबईकरांनी केली आहे. त्यामुळे महागड्या गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यूने पहिला क्रमांक पटकावला आहे. कोरोना काळात दोन वर्षे नागरिकांची आर्थिक आवक थांबली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षात नागरिकांची आर्थिक गाडी हळूहळू रुळावर आल्यानंतर गेल्या काही दिवसात महागड्या गाड्या आयात करण्याचे प्रमाण वाढले आहे.

- Advertisement -

हेही वाचा… CAG : कॅगचे ताशेरे; महाराष्ट्र सरकारच्या लोकानुनयी योजनांमुळे तिजोरीवर बोजा वाढला

तर, फेरारी, लेम्बोर्गिनी, मिनी कूपर, जागवार, मर्सिडीज, फोर्स, रोल्स, रॉयल्स यासारख्या चार चाकी तर अमेरि का ड्रीम्स, डुकाटी, मॉन्स्टर, स्क्रॅंबलर या दुचाकींच्या प्रेमात श्रीमंत मुंबईकर पडले आहेत. वर्षभरात कोट्यावधी किमतीच्या महागड्या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात मुंबईकरांनी तब्बल 14000 महागड्या गाड्यांची खरेदी केल्याची आकडेवारी समोर आली आहे. 2024 मध्ये 19 डिसेंबरपर्यंत ताडदेव आरटीओमध्ये 665, अंधेरी आरटीओमध्ये 495, वडाळा आरटीओमध्ये 130, बोरिवली आरटीओमध्ये 120 अशा एकूण 1410 वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. मुंबईत ताडदेव आरटीओ मध्ये सर्वाधिक वाहनांची नोंदणी करण्यात आली आहे. या वाहनांचा दुरुस्तीचा खर्च अधिक आहे. या वाहनांवर 20 टक्के नोंदणी शुल्क आकारण्यात आले आहे. गेल्या वर्षी 1410 वाहनांची नोंदणी झाली. या वाहनांची किंमत एक कोटीहून अधिक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -