घरमुंबईपीएमसी घोटाळ्याचा पहिला बळी, ५१ वर्षीय खातेधारकाचा मृत्यू

पीएमसी घोटाळ्याचा पहिला बळी, ५१ वर्षीय खातेधारकाचा मृत्यू

Subscribe

आंदोलनात सहभागी झालेल्या ओशिवरा येथील ५१ वर्षीय खातेधारकाचा आंदोलनानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

आरबीआयने पीएमसी बँकेवर आर्थिक बंधने लादल्यानंतर बँकेच्या खातेधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. आंदोलनं, मूक मोर्चा अशा विविध मार्गांनी खातेधारक आपला संताप व्यक्त करत आहेत. अशाच एका आंदोलनात सहभागी झालेल्या ओशिवरा येथील ५१ वर्षीय खातेधारकाचा आंदोलनानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संजय गुलाटी असे मृत्यू झालेल्या खातेधारकाचे नाव आहे. ओशिवरा येथील तारापोर येथे पत्नी आणि दोन मुलांसोबत ते राहत होते.

pmc bank customer died

- Advertisement -

संजय गुलाटी यांच्या खात्यात ९० लाख रुपये

पीएमसीच्या ओशिवरा येथील शाखेत संजय गुलाटी यांच्या कुटुंबीयांचे ९० लाख रुपये होते. सोसायटीचे सचिव यतिंद्र पाल म्हणाले की, “संजय आणि त्यांचे वडील सी. एल. गुलाटी हे जेट एअरवेज मध्ये काम करत होते. संजय यांनी नोकरी गमावल्यानंतर आता त्यांनी त्यांची बचत सुद्धा गमावली आहे. थायरॉइड शिवाय त्यांना तब्येतीची कोणतीही तक्रार नव्हती. सोमवारी पीएमसीच्या खातेधारकांनी निषेध व्यक्त करण्यासाठी काढलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले होते. या आंदोलनात त्यांनी अनेकांना रडताना पाहिले. संध्याकाळी ३.३० वाजता संजय घरी आले आणि झोपले. त्यानंतर जवळपास ४.४५ वाजता त्यांनी आपल्या पत्नीला जेवायला वाढण्यास सांगितले. जेवताना अचानक खाली पडून त्यांचा मृत्यू झाला. आम्हा सगळ्यांना खूप मोठा धक्का बसला.”

त्यांनी पुढे सांगितले की, “संजय यांची पत्नी घरी एकटीच होती. त्यामुळे त्यांनी मला दूरध्वनी केला. त्यानंतर आम्ही संजय यांना कोकीलाबेन हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करताच त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर मी पोलिसांना फोन केला.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -