Tuesday, February 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी रात्री उशिरापर्यंत मुंबई पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन

रात्री उशिरापर्यंत मुंबई पोलिसांचे ऑल आऊट ऑपरेशन

३९ फरार आरोपींवर पोलिसांकडून कारवाई तर २५९ ठिकाणी कोंबिग ऑपरेशन करून ११ हजार ८८१ वाहनांची तपासणी

Related Story

- Advertisement -

मुंबई शहरात शनिवारी रात्री उशिरा अचानक मुंबई पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन मोहीम हाती घेतली होती. या कारवाईत पोलिसांनी ३९ फरार आरोपींना अटक केली. एकूण २५९ ठिकाणी कोंबिग ऑपरेशन करण्यात आले तर ११ हजार ८८१ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यात ३ हजार १४१ वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हप्रकरणी ३१ जणांना अटक करण्यात आली होती.

शनिवारी रात्री अकरा वाजता ते रात्री उशिरा दोन वाजेपर्यंत अचानक मुंबई पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशन मोहीम सुरू केली होती. या कारवाईदरम्यान ३९ फरार असलेल्या आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली. २५९ ठिकाणी नाकाबंदी करून ११ हजार ८८१ वाहनांची पोलिसांनी तपासणी केली होती. पाच प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, १३ पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि ९३ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी आपल्या हद्दीत विशेष मोहीम हाती घेतली होती.

- Advertisement -

या कारवाईत पोलिसांनी २२३ ठिकाणी कोबिंग ऑपरेशन केले. त्यात अभिलेखावरील १ हजार २७८ आरोपी आणि दत्तक योजनेअंतर्गत १ हजार ५६१ आरोपी तपासण्यात आले तर ५९९ आरोपी मिळून आले. तर ३९ फरारी आरोपींवर अटकेची कारवाई करण्यात आली. ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान ५० भिक्षेकरी/वाघरी यांच्यावर तर प्रतिबंधात्मक कारवाईच्या अनुषंगाने ५०५ मर्मस्थळे आणि संवेदनशील ठिकाणाची तपासणी करण्यात आली होती.

ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी काही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. अवैध शस्त्रे बाळगणार्‍या ३७ जणांना अटक करून त्यांच्याकडून घातक शस्त्रे जप्त करण्यात आली. सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत १४९ ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती, त्यात ११ हजार ८८१ चारचाकी आणि दुचाकी वाहने तपासण्यात आली. मोटार वाहन कायद्यांतर्गत ३ हजार १४१ चालकावंर तर १८५ कलमांतर्गत ३१ मद्यपी चालकांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हप्रकरणी कारवाई करण्यात आली होती. बेकायदेशीर वास्तव्य करणार्‍यांवर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून ९५१ विविध हॉटेल, लॉज आणि मुसाफिरखाने तपासण्यात आली. ४२ अवैध धंद्यांवर छापे टाकून तिथे चालणारे अवैध धंदे बंद करण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी ७१ जणांना अटक केली. ३७ तडीपार केलेल्या आरोपीविरुद्ध मपोका कलम १४२ अन्वये कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कायद्याचे कलम १२०, १२२, १३५ अन्वये ९० जणांवर तर १३५ फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. अजामिनपात्र वॉरंटमधील एकूण १७६ आरोपींना अटक करून त्यांना नंतर लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. इतर ९८ कारवायांची नोंद झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.


- Advertisement -

हेही वाचा – मोबाईलवर पॉर्न पाहणाऱ्यांवर १०९० टीमचा वॉच


 

- Advertisement -