घरCORONA UPDATEमुंबई पोलिसांना चॅलेंज करणं दोघा टीकटॉक स्टारला पडलं महागात!

मुंबई पोलिसांना चॅलेंज करणं दोघा टीकटॉक स्टारला पडलं महागात!

Subscribe

लॉकडाऊन काळात मुंबईतील डोंगरी परिसरात व्हिडीओ तयार करून टिकटॉकवर टाकणे डोंगरीतील दोन टीकटॉक स्टारला चांगलेच महागात पडले आहे. टिकटॉकवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवरून डोंगरी पोलिसांनी या दोघांचा शोध घेऊन दोघांना अटक करण्यात आली आहे.

मोहम्मद युसूफ शेख (२४) आणि आसिफ रशीद शेख (१९) मोहम्मद हा पायधुनी परिसरात राहण्यास असून आसिफ हा डोंगरी परिसरात राहण्यास आहे. हे दोघे टिकटॉक स्टार असून या दोघांचे हजारो फॉलोअर्स आहेत. मुंबईत लॉकडाऊनच्या काळात या दोघांनी रस्त्यावर अनेक व्हिडीओ तयार करून हे व्हिडीओ टिकटॉक अपलोड केलेले आहेत. यापैकी अनेक व्हिडीओ आक्षेपार्ह असून त्यात मुंबई पोलिसांना चॅलेंज करण्यात आलेले आहे. या दोघांचे टिकटॉक वरील व्हिडिओ डोंगरी परिसरात व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाले होते. हे व्हिडीओ बघून डोंगरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी लॉकडाऊन काळात रस्त्यावर आक्षेपार्ह व्हिडीओ बनवून ते व्हायरल केल्याप्रकरणी या दोघांविरोधात डोंगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या दोघांचा शोध घेऊन दोघांना अटक केली.

- Advertisement -

दोघांना अटक करण्यात आल्यानंतर या दोघांनी पोलिसांकडे माफी मागून या पुढे कधीच व्हिडीओ तयार करून व्हायरल करणार नसल्याची कबुली दिली. या दोघांनी माफी मगितल्याचा व्हिडीओ मात्र चांगलाच व्हायरल झाला असून पोलिसानी या टिकटॉक स्टारवर कारवाई करून दोघांची चांगलीच जिरवली आहे.

टीकटॉक व्हिडिओ करून मुंबई पोलिसांना चॅलेंज देणाऱ्या दोघा टीकटॉकर्सला घडली जन्माची अद्दल! #MyMahanagar

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 18, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -