घरमुंबईहनुमान चालिसा प्रकरणात पहिली कारवाई, मुंबईत मनसे विभागाध्यक्षाला अटक

हनुमान चालिसा प्रकरणात पहिली कारवाई, मुंबईत मनसे विभागाध्यक्षाला अटक

Subscribe

औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी 4 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा असा राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. तर या आधी गुढीपाढवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे काढले नाही तर मशिदींसमोर लाउडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला होता.

औरंगाबाद येथील सभेत नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ पोलिसांनी राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांना नोटिसाही पाठवल्या आहेत. तर आता पोलिसांनी अटकेचीही कारवाई सुरू केली आहे.  घाटकोपर येथील मशिदीसमोर लाउडस्पीकरवर हनुमान चालिसा लावणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. हनुमान चालीसा वादात मनसे पदाधिकाऱ्याला झालेली ही पहिली अटक आहे

औरंगाबाद येथील सभेत राज ठाकरे यांनी 4 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा असा राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. या आधी गुढीपाढवा मेळाव्यात मशिदींवरील भोंगे काढले नाही तर मशिदींसमोर लाउडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवा असा आदेश कार्यकर्त्यांना दिला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. राज ठाकरे यांच्यावर प्रक्षोभक भाषणासाठी औरंगाबाद येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मनसेचे अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांना नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

आता मुंबईत मनसेचे चांदिवली विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी अटक केली आहे.भानुशाली यांनी घाटकोपर येथे मशिदीसमोर हनुमान चालीसा लावली होती. पोलिसांनी याप्रकरणी भानुशाली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांना मंगळवारी बर्वेनगर स्मशानभूमी येथून अटक केली. भानुशाली यांच्या चांदिवली येथील कार्यालयातून  लाउडस्पीकर्सही जप्त करण्यात आले आहेत.  दरम्यान, मनसेचे बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, संतोष धुरी आदी नेते पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगितले जात आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -