घरक्राइममुंबादेवी महिला मारहाण प्रकरणी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक

मुंबादेवी महिला मारहाण प्रकरणी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक

Subscribe

मुंबई : नागपाडामधील मुंबादेवी परिसरात गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्यावरून झालेल्या वादात एका महिलेला मारहाण झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या मारहाण प्रकरणी आता मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. नागपाडा पोलिसांनी मनसे उप विभागप्रमुख विनोद अरगिले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. (mumbai police arrested three mns party workers for assaulting a woman at nagpada mumbadevi after video viral)

विनोद अरगिली यांच्यासह राजू अरगिले व सतीश लाड अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावं आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, मुंबादेवी परिसरात गणेश भक्तांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यासाठी आरोपींनी पीडित महिलेच्या दुकानासमोर बांबू उभे केले होते, यावेळी पीडित महिलेने दुकानासमोर बांबू उभे करण्यास विरोध केला. ज्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी महिलेला शिवागाळ करत मारहाण केली, या घटनेचा व्हिडीओ कालपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यावर युजर्सकडूनही संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून विनोद अरगिले, राजू अरगिले, सतीश लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या तिघांच्या विरोधात नागपाडा पोलिसांनी कलम 323, 337, 506, 504, 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

ही घटना दोन दिवसांपूर्वीची असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबईच्या मुंबादेवी परिसरात एका मेडिकल स्टोरसमोर गणेश मंडप उभारण्यावरून वादाला सुरुवात झाली. मनसेचे काही पदाधिकारी त्य मेडिकलसमोर बांबू उभारत होते. यावेळी एक महिला त्यांना मंडप उभारण्यापासून रोखत असल्याचे व्हिडीओत दिसते. ज्यावर मनसेच्या पदाधिकाऱ्याकडून संबंधित महिलेला मारहाण करण्यात आल्याचेही व्हिडीओमधून स्पष्ट दिसत आहे.

- Advertisement -

याबाबत मनसे उपविभाग प्रमुख विनोद अरगिले एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, महिलेने विरोध केल्यानंतर आम्ही मेडिकल शॉप पासून काही अंतरावर बांबू लावले. मात्र त्यानंतरही संबंधित महिलेने राज ठाकरेंबाबत अपशब्द वापरले. त्यामुळे उपस्थित असलेले मनसेचे कार्यकर्ते संतप्त झाले व महिलेला मारहाण करण्यात आली.


मुंबादेवी परिसरात बॅनर लावण्यावरून मनसे कार्यकर्त्यांची महिलेला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -