Sunday, April 11, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई Night Curfew: जमावबंदीच्या वेळेत विनाकारण फिरणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची कारवाई

Night Curfew: जमावबंदीच्या वेळेत विनाकारण फिरणाऱ्यांवर मुंबई पोलिसांची कारवाई

Related Story

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या नियमावलीनुसार राज्यात रात्रीच्या जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. २७ मार्चच्या मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू करण्यात आले असून ते १५ एप्रिलपर्यंत असणार आहे. या जमावबंदीदरम्यान, पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असून रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत जमावबंदी कायम आहे. यामध्ये नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे या नियमांचं पालन अनिवार्य आहे. मुंबईत देखील कोरोना बाधितांचा आकडा सतत वाढत असल्याने मुंबईतही जमावबंदीचे पालन काटेकोरपण केलं जात आहे. याकरता रात्री मुबंईत ठिकठिकाणी पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. यावेळी मुंबईकर नागरिकांनी कोरोनाच्या नियमांसह जमावबंदीच्या आदेशाचं पालन केले नाही तर त्यांच्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

राज्यात जमावबंदीचे आदेश देण्यात आल्यानंतर मुंबईसह अनेक राज्यात नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईत करण्यात आलेल्या नाईट कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून अनेक ठिकाणी रात्री नाकाबंदी करण्यात आली आहे. रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच रॅश ड्राईव्हिंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून कठोर कारवाई केली जात आहे. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरी जाण्यातं आवाहन करण्यात आले होते.

- Advertisement -

असे आहेत नवे निर्बंध

  • सर्व उपाहारगृहे, सिनेमागृहे, मॉल, नाट्यगृहे, सभागृह, रात्री ८ वाजता बंद होणार
  • उपहारगृहांना घरपोच किंवा उपाहारगृहातून खाद्यपदार्थ घेऊन जाण्याची परवानगी
  • लग्न सोहळ्यासाठी जास्तीतजास्त ५०, तर अंत्यसंस्करासाठी २० लोकांना परवानगी.
  • कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास सिनेमागृहे, उपाहारगृहे, मंगलकार्यालये किंवा नाट्यगृहांना साथ संपेपर्यंत बंद राहणार यासह मालकांवर गुन्हे दाखल होणार.
  • राज्यात सर्वत्र सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी
  • सांस्कृतिक सभागृहातही कार्यक्रम घेण्यास मज्जाव

- Advertisement -