नुपूर शर्मा चार दिवसांपासून बेपत्ता, मुंबई पोलिसांचा दावा

पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानाप्रकरणी भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांना भाजपने निलंबित केले आहे. शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचे इस्लामी देशांमध्ये तीव्र पडसाद उमटले. पाकिस्तानसह ओआयसी या इस्लामी देशांच्या संघटनेनेही भारतावर कडाडून टीका केली.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (BJP spokesperson Nupur Sharma) ह्या मागील चार दिवसांपासून बेपत्ता असल्यचाा दावा मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केला आहे. नोटीस (notice) बजावण्यासाठी पाठवलेल्या पथकाला चार दिवसांपासून नुपूर शर्मा सापडल्या नाहीत, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.  नुपूर शर्मा यांना 11 जून रोजी मुंबईतील पायधुनी पोलिस स्टेशनने 25 जूनला पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. ते समन्स देण्यासाठी पोलीस पथक गेले होते.

एका टीव्ही चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद (Prophet Mohammad) यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी नुपूर शर्मांना पायधुनी पोलिसांनी (Paydhuni police) नोटीस बजावून जबाब नोंदवण्यासाठी २५ जून रोजी हजर राहण्यास सांगितले आहे. रझा अकादमीच्या मुंबई विंगचे सहसचिव इरफान शेख यांच्या तक्रारीनंतर नुपूर शर्मांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याबद्दल, शत्रुत्व वाढवल्याबद्दल आणि सार्वजनिक क्षोभ निर्माण केल्याबद्दल गुन्हा नोंदवण्यात आला आहे. महाराष्ट्रात नुपूर शर्मांविरुद्ध अनेक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

जबानी नोंदवण्यासाठी मुंबई पोलिसांनी त्यांना समन्स बजावले होते. या नोटिशीसाठी गेल्या चार दिवसांपासून पोलिसांचे पथक नूपूरचा शोध घेत होते. मात्र त्यांचा शोध लागत नसल्याचा दावा मुंबई पोलिसांकडून केला जात आहे. नुपूर शर्मा चार दिवसांपासून बेपत्ता असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

पैगंबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानाप्रकरणी भाजपच्या प्रवक्त्या नूपुर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांना भाजपने निलंबित केले आहे. शर्मा यांच्या वादग्रस्त विधानाचे इस्लामी देशांमध्ये तीव्र पडसाद उमटले. पाकिस्तानसह ओआयसी या इस्लामी देशांच्या संघटनेनेही भारतावर कडाडून टीका केली. तसेच आखाती देशांनी भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचीही मागणी केली.

कतार, कुवेत, इराण यांनतर सौदी अरेबिया, बहारीन, अफगाणिस्तान, संयुक्त अरब आमिराती, मालदीव, जॉर्डन यांच्यामागोमाग पाकिस्ताननेही शर्मा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शर्मा यांचे विधान मुस्लिमांच्या भावनांना ठेच पोहचवणारे, चिथावणीखोर असल्याचा या सर्वच देशांनी आरोप केला . तर काही देशांनी नुसता निषेध व्यक्त न करता भारताने जाहीर माफी मागावी अशी मागणीही केली. त्यानंतर भाजपने शर्मा आणि जिंदल यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला.