Tuesday, February 23, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम धक्कादायक : पंतप्रधान योजनेच्या बनावट ॲप्लिकेशनद्वारे फसवणूक, ४ जणांना अटक

धक्कादायक : पंतप्रधान योजनेच्या बनावट ॲप्लिकेशनद्वारे फसवणूक, ४ जणांना अटक

आरोपींनी संपर्क साधण्यासाठी योजनेच्या ॲप्लिकेशनमध्ये एका अज्ञात तरुणाचा मोबाईल नंबरचा वापर

Related Story

- Advertisement -

पंतप्रधानांचा फोटो आणि राजमुद्रेचा गैरवापर करुन हजारो लोकांना गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलच्या कारवाईत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंतप्रधान कार्यालयामार्फत योजनांचा आधार घेत ४ जणांनी अनेकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे जर तुम्ही पंतप्रधान कार्यालयाद्वारे कोणत्या लोन योजना आणि इतर योजनांसाठी पैसे भरले असतील तर तुमची आर्थिक फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. याच प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने योजनांच्या नावाने फसवणूक केल्याप्रकरणी ४ जणांच्या मुंबईत मुसक्या आवळल्या आहेत. या फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफास केल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे तसेच अनेक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

काय आहे प्रकरण

पंतप्रधान मोदी आणि राजमुद्रेचा गैरवापर करुन या ४ आरोपींनी पंतप्रधान कार्यालयामार्फत पुरवण्यात येणाऱ्या योजना आणि आर्थिक योजनांच्या नावे बनावट ॲप्लिकेशन तयार केले. या ॲप्लिकेशनचा वापर करुन नागरिकांना गंडा घातला जात होता. यामध्ये धक्कादायक माहिती अशी आहे की, या आरोपींनी लोकांची फसवणूक करण्यासाठी पेपरमध्ये जाहिराती दिल्या होत्या तसेच या जाहिरातींच्या जोरावर हजारो लोकांची फसवणूकही केली आहे.

- Advertisement -

आरोपींनी संपर्क साधण्यासाठी योजनेच्या ॲप्लिकेशनमध्ये एका अज्ञात तरुणाचा मोबाईल नंबरचा वापर केला होता. हा तरुण मुंबईमधील कुर्ल्यातील रहिवासी आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांचा या तरुणाला वारंवार धमक्यांचे फोन येऊ लागले यामुळे तरुणाने पोलिसांत धाव घेवून तक्रार दाखल केली. तरुणाने दिलेल्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी तपास सुरु केल्यावर सदर प्रकार उघडकीस आला आहे.


हेही वाचा : संजय राठोड पोहरादेवीला येणार, मंदिराच्या परिसरात फौजफाटा तैनात


- Advertisement -

आरोपींनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी पीएमवायएलसारख्या अनेक योजनांच्या नावे बनावट ॲप्लिकेशन बनवले आहेत. यामध्ये एका योजनेसाठी व्यक्तीकडून ३ हजारापर्यंतची रक्कम आकारली आहे. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचाही संबंध आहे. या चौघांवरही तंत्रज्ञान गैरवापर प्रतिबंधककायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -