मुंबईत चोरलेल्या मोबाईलची बांगलादेशात विक्री, चोरीच्या मोबाईलचे ‘हब’ मुंबई पोलिसांनी केले उद्ध्वस्त

मुंबईतील गोवंडी शिवाजी नगर या ठिकाणी चोरीचे मोबाईल विकत घेण्याचे मुंबईतील सर्वात मोठे हब

Mumbai Police destroy hub of stolen mobiles at Govandi
मुंबईत चोरलेल्या मोबाईलची बांगलादेशात विक्री, चोरीच्या मोबाईलचे 'हब' मुंबई पोलिसांनी केले उद्ध्वस्त

मुंबईत सध्या चोरांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे. मुंबईत लोकल असो किंवा पदपथावर सर्रासपणे मोबाईल फोन चोरी (stolen mobiles ) केले जातात. आपले चोरीला गेलेले फोन नंतर जातात कुठे त्यांचे काय होते असा प्रश्न आपल्याला नक्कीच कधीना कधी पडला असेल. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पथकाने चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांना यात महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. मुंबईतील गोवंडी शिवाजी नगर या ठिकाणी चोरीचे मोबाईल विकत घेण्याचे मुंबईतील सर्वात मोठे हब असल्याची माहिती समोर आली आहे. (Mumbai Police destroy hub of stolen mobiles at Govandi ) चोरीचे मोबाईल विकत घेऊन हे मोबाईल हैदराबाद, बंगळुरू, नेपाळ, बांगलादेश या ठिकाणी त्याची विक्री केली जात होती.

मुंबईतील लोकल ट्रेन,बेस्ट बस आणि पदपथावर मोठ्या प्रमाणात चोरी होणारे मोबाईल फोन गोवंडीच्या शिवाजी नगर येथे नेऊन विकले जात होते. शिवाजी नगर मध्ये चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्यांची मोठी संख्या असून शिवाजी नगर हे चोरीचे मोबाईल खरेदी विक्रीचे मोठे हब तयार झाले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ६ च्या पथकाने गोवंडी शिवाजी नगर परिसरात मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. चोरीचे मोबाईल विकत घेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून मोठ्या प्रमाणात चोरीचे मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत.


हेही वाचा – मुंबई सायबर विभागाचा ईमेल आयडी हॅक, राज्यभरातील पोलीस ठाण्यांना पाठवले जात आहे ईमेल