Mumbai Police : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा मोठा निर्णय; पोलिसांची ड्युटी आता आठ तास

mumbai police eight hours duty to police constable to asi decision of mumbai police commissioner sanjay pandey
Mumbai Police : मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा मोठा निर्णय; पोलिसांची ड्युटी आता आठ तास

मुंबई पोलीस दलातील महिला पोलिसांपाठोपाठ आता पोलीस अमंलदार आणि अधिकाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पोलीस शिपाई आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपर्यंतच्या कर्मचाऱ्यांनाही आता आठ तास ड्युटी असणार असल्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे आयुक्तांनी घेतला आहे. नुकतचं आयुक्तांनी आठ तास ड्युटीच्या परिपत्रकावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस शिपाई आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपर्यंतच्या कर्मचाऱ्यांचा 8 तासांच्या ड्युटीचा मार्ग मोकळ धाला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला हा दुसरा मोठा निर्णय आहे.

लवकरचं 50 वर्षांखालील पोलिसांना 8 तास आणि 50 वर्षांवरील पोलिसांसाठी 12/24 तासांचा फॉर्म्युला लागू होणार आहे. 17 मेपासून या आदेशाची अंमलबजाणी सुरु होईल. मुंबईनंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण राज्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. पोलिसांच्या चांगली कार्यक्षमता आणि सक्षमीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान संजय पांडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी दुसरी खास भेट दिली आहे. त्यामुळे आता पोलीस शिपाई आणि आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपर्यंतच्या कर्मचाऱ्यांनाही आठ तास ड्युटी असणार आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांना याबाबत एक आदेश जारी केला आहे. या आदेशत म्हटले की, “मुंबई पोलीस दलात महिला कर्मचाऱ्यांना ‘8 तास काम आणि 16 तास आराम’ ही कार्य पद्धत सुरु केल्यानंतर त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येत आहे. या कर्तव्य पद्धतीचा फायदा पोलीस अंमलदारांनाही मिळावे असा विचार आला आणि त्यांच्यासाठी ‘8 तास कर्तव्य 16 तास आराम’ अशी ड्युटी सुरु करण्याची विनंती केली.

दरम्यान मुंबई पोलिसांच्या कर्तव्य पद्धतीवर काम करण्यासाठी मुंबईतील पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कर्तव्य समिती स्थापन करण्यात आली. या समितीनेच काही शिफारशींसह एक अहवाल सादर केला आहे. दरम्यान पोलीस स्टेशनमध्ये ड्युटीच्या वेळापत्रकामुळे बऱ्याच पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या आरोग्याकडे तसेच कुटुंबीयांकडे, मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्यास वेळ मिळत मिळत नाही. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या सक्षमीकरणासाठी आणि कार्यक्षमतेसाठी काही ठराविक परिस्थिती वगळता 8 तास कर्तव्य आणि 16 तास आराम ही पद्धत योग्य असल्याची शिफारस समिती सदस्यांनी केली आहे.


राज ठाकरेंनी व्यंगचित्रकला सोडून भोंग्यांचं राजकारण सुरु केलं; संजय राऊतांचा टोला