घरताज्या घडामोडीमुंबई पोलिसांकडून शहरात जमावबंदीचा आदेश जाहीर

मुंबई पोलिसांकडून शहरात जमावबंदीचा आदेश जाहीर

Subscribe

महामारी कायदा १८९७ अन्वये तसेच महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ न्वये एका जाहीर परिपत्रकानुसार ४ मार्च रोजी मार्गदर्शके जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये राज्यातील कोरोनाचा वाढता प्रसार पाहता, संपूर्ण राज्यात आपत्कालीन अशा स्वरूपाचे प्रतिबंधात्मक उपाय हे ४ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत जाहीर करण्यात आले. याच आधारे मुंबई पोलिसांकडून मुंबई शहरामध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोड, (सीपीसी) १९७३ अन्वये कलम १४४ न्वये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. राज्यातील कोरोनाचे संकट पाहता कोरोनाच्या महामारीचा धोका, आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेच हे जमावबंदीचे आदेश राज्यात लागू करण्यात आले आहेत. जमावबंदीच्या आदेशान्वये मुंबई पोलिसांच्या हद्दीतील क्षेत्रात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पालन करणे अनिवार्य असेल. त्यामध्ये दोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवणे, चेहरा कव्हर करणे यासारख्या नियमांचे पालन करणे महत्वाचे असणार आहे. त्यासोबतच मुंबईत रात्रीच्या वेळेत कर्फ्युचाही आदेश मुंबई पोलिसांकडून जाहीर करण्यात आला आहे. तर विकेंडच्या कालावधीत शुक्रवारी रात्री ९ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यु अंमलात असणार आहे. येत्या ४ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत ही नियमावली अंमलात असेल. या आदेशाची अंमलबजावणी ही ५ एप्रिल रात्री ८ वाजल्यापासून ते ३० एप्रिल ११.५९ वाजेपर्यंत लागू असेल.

- Advertisement -

जमावबंदीच्या कालावधीत कलम १४४ ची अंमलबजावणी झालेली असतानाच प्रत्येक दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री ८ वाजेपर्यंत ५ पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमता येणार नाही. तर कर्फ्युच्या कालावधीत म्हणजे रात्री ८ ते सकाळी ७ दरम्यान कोणतीही व्यक्ती ही योग्य कारणाशिवाय संचार करू शकणार नाही, असे आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. विकेंडच्या कालावधीत मात्र कडक लॉकडाऊन असेल. या कालावधीत अत्यावश्यक सेवा सुरू असतील. त्यामध्ये शासकीय यंत्रणा आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता कोणालाही या कालावधीत कुठेही संचार करण्यासाठी मज्जाव असेल.

काय बंद, काय सुरू?

  • सार्वजनिक वाहतूक सेवा ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार
  • मॉल्स, हॉटेल्स बंद
  • अत्यावश्यक सेवा सुरू राहणार
  • सिनेमागृह आणि नाट्यगृह बंद राहणार
  • खेळ्याची मैदाने आणि उद्याने बंद राहणार
  • बस, मुंबई लोकलमध्ये आसन क्षमतेनुसारच प्रवास करता येणार
  • रेस्टॉरंटमध्ये केवळ पार्सल सेवा सुरू राहणार
  • गृहनिर्माण क्षेत्रातील सर्व कामे सुरू राहणार
  • ‘वर्क फ्रॉम होम’ करण्यावर अधिक भर दिला जाणार
  • रिक्षामध्ये चालक आणि दोन प्रवाशांनाच परवानगी
  • विकेंड लॉकडाऊनच्या काळात गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळे बंद
  • विकेंड लॉकडाऊनमध्ये धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमांवर बंदी
  • सरकारी कार्यालय ५० टक्के क्षमतेने काम करणार
  • इंडस्ट्री सुरू राहणार, कामगारांवर कुठलेही निर्बंध नाहीत
  • सर्व ट्रान्सपोर्ट व्यवस्था सुरु राहणार
  • मास्क घालणे बंधनकारक
  • सरकारी ठेके असलेली कामे सुरु राहणार
  • भाजी मार्केवर कुठलेही निर्बंध नाहीत, फक्त गर्दी कमी करण्याकरिता कठोर नियम असतील.
  • शूटिंगला गर्दी होणार नाही अशा ठिकाणी परवानगी दिली जाणार

हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत कोरोनाचा उद्रेक! कोरोना रुग्णसंख्येचा नवा उच्चांक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -