सावधान! विनाकारण हॉर्न वाजवल्यास पडेल महागात, मुंबई पोलिसांची ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मोहीम

Mumbai Police is launching a new campaign to curb noise pollution
सावधान! विनाकारण हॉर्न वाजवल्यास पडेल महागात, मुंबई पोलिसांची ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मोहीम

मुंबई पोलीसांनी ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी एक नवी मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत ट्रॅफिक पोलीसांनी बुधवारी नो हॉनकिंग दिवस साजरा केला. यावेळी ट्रॅफिक पोलीसांनी सर्व रस्त्यांवर विनाकारण हार्न वाजवणाऱ्यावर कारवाई केली. शहरात जवळपास 100 ठीकाणी ही कारवाई करण्यात आली. पोलीस ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना रस्ते सुरक्षा नियम समजावत आहेत. यासाठी पोलीस स्वय:सेवकांची मदत घेत आहेत.

दोन तासात इतक्या वाहन चालकांवर कारवाई –

पोलीसांनी केवळ दोन तासात या अभियानाअंतर्गत 1856 वाहन चालकांवर कारवाई केली. यावेळी वाहन चालकाकडून प्रति चालक 1 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला. प्रमुख तपास नाक्यांवर अनावश्यक हॉर्नच्या प्रकरणांशीवाय इतर 14754 जणांणा दंड करण्यात आला. वीरुद्ध बाजूने गाजी चालवणाऱ्यावर 217 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मे महिन्यात पोलीसांनी 15389 वाहन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

या नंबरवर करता येणार तक्रार –

जोरात हॉर्न वाजवणाऱ्या वाहन चालकांवर पोलीस हेल्पलाईन नंबर 8454999999 तक्रार करता येणार आहे.

यांच्यासाठी मोहीमेचे आयोजन –

मुंबई ट्रॅफिक पोलीस डीसीपी राज तिलक रौशन यांनी हॉन्कींग अभियानाचा उद्देश विद्यार्थी, जेष्ठ नागरीक, आजारी व्यक्तींना ध्वनी प्रदूषणा पासून दिलासा देणे हा आहे. या अभियानाद्वारे मोठ्या आवाजात हॉर्न वाजवणाऱ्या आणि गाडीचा सायलेंसर मोठ्या आवाजाचा बसवणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जात आहे, असे सांगीतले.