मुंबै बँक मजूर प्रकरणी मुंबई पोलिसांची प्रवीण दरेकरांना नोटीस; चौकशीला हजर राहण्याचे आदेश

मुंबै बँक मजूर प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली असून, या प्रकरणात चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबै बँक मजूर प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्यामुळं विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवली असून, या प्रकरणात चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान ही नोटीस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या नोटीसनुसार, मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात येत्या सोमवारी म्हणजे ४ एप्रिल रोजी प्रविण दरेकर यांना हजर होण्याचे आदेश या नोटीशीत आहेत. आम आदमी पक्षाच्या वतीने धनंजय शिंदे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरुन प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मजूर नसतानाही प्रवीण दरेकर यांनी मुंबै बँक संचालक पदाची निवडणूक लढवली. त्या माध्यमातून दरेकर यांनी मुंबै बँकेचे ठेविदार, प्रशासन आणि सरकार यांची २० वर्षे फसवणूक केली असा आरोप दरेकर यांच्यावर आहे.

प्रवीण दरेकर यांना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश आहेत. प्रविण दरेकर हे मजूर प्रवर्गातून संचालक म्हणून १९९७ पासून मुंबै बँकेवर निवडून येत आहेत.

प्रविण दरेकर हे नागरी सरकार बँक आणि मजू अशा दोन्ही प्रवर्गातून निवडून आले होते. त्याची मुंबै बँकेवर संचालक म्हणूनही बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान, प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने मजूर यांना अपात्र ठरवले.

प्रवीण दरेकर यांनी आपल्यावर होणारी कारवाई टाळण्यासाठी न्यायालयात दाद मागितली. प्रविण दरेकर यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दोन आठवड्यांचा दिलासा दिलासा दिला आहे. दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला आहे. या जामीन अर्जावर २९ मार्च रोजी हायकोर्टात वेळेअभावी सुनावणी पार पडू शकली नाही. त्यामुळे दरेकर यांचे वकील अखिलेश चौबे यांनी न्यायालयाकडं मागणी केली की, पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून दिलासा कायम ठेवण्याची मागणी केली आहे.

काय आहे मुंबै बँक मजूर प्रकरण?

मुंबै जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर मजूर आणि नागरी सहकार बँक अशा दोन्ही वर्गातून निवडून आले होते. मात्र, निवडणुकीचा निकाल अधिकृतपणे जाहीर होत असतानाच दरेकर यांना मजूर वर्गासाठी अपात्र घोषित करण्यात आले. निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवीण दरेकर यांनी मजूर प्रवर्गातील संचालकपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, सहकार विभागानं या प्रकरणाची चौकशी सुरूच ठेवली होती. दरेकर यांनी ज्या मजूर संस्थेचे प्रतिनिधी म्हणून मुंबै बँकेची निवडणूक लढविली होती त्या प्रतिज्ञा मजूर संस्थेत ते रंगारी असल्याचे दाखवण्यात आले होते.


हेही वाचा – ‘मला त्यात अजिबात रस नाही…’; युपीएच्या अध्यक्षपदाबाबत शरद पवारांचं मोठं विधान