याप्रकरणी समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस समन्स पाठवणार

mumbai police may be send summoned to ncb zonal director sameer wankhede
याप्रकरणी समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस समन्स पाठवणार

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना मुंबई पोलिसांकडून समन्स बजावण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे यांनी आपल्या मागावर गुप्तहेर लावण्यात आल्याची तक्रार केली होती. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलीस वानखेडे यांना समन्स बजावणार असल्याचे समोर आले आहे. (mumbai police may be send summoned to ncb zonal director sameer wankhede)

समीर वानखेडे हे एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणाचे मुंबई विभागाचे संचालक आहेत. मागील वर्षभरापासून वानखेडे यांनी बॉलिवूड संबंधित तसेच ड्रग्स माफिया यांच्या विरोधात रण छेडले आहे. मध्यंतरी वानखेडे यांनी एका राजकीय पक्षाच्या नातेवाईकाला देखील अटक केली होती. या सर्व कारवाई नंतर समीर वानखेडे हे ड्रग्स माफियांच्या नजरेत आले आहेत. त्यातच त्यांनी नुकतीच कॉर्डिलिया या क्रूझवर कारवाई करून बॉलिवूड मधील सुपरस्टार शाहरुख खान याच्या मुलाला अटक केली आहे. या कारवाई नंतर समीर वानखेडे अधिक चर्चेत आले असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन एनसीबीच्या कारवाईवर संशय व्यक्त केला होता.

दरम्यान एनसीबीचे संचालक समीर वानखेडे हे दररोज कब्रस्तानमध्ये आईच्या थडग्यावर फुले वाहण्यासाठी आणि दर्शनासाठी जातात. त्यावेळी त्यांच्यावर काही व्यक्ती पाठलाग करीत असल्याचा संशय वानखेडे यांना असून हे व्यक्ती पोलीस कर्मचारी यांच्यासारखे दिसतात व आपला पाठलाग का करीत आहे याचा संदर्भ वानखेडे यांना लागलेला नसून त्यांनी कब्रस्तान मधील सीसीटीव्ही मध्ये तपासले असता काही व्यक्ती त्यांचा पाठलाग करीत असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर ११ ऑक्टोबरला वानखेडे हे सीसीटीव्ही फुटेज घेऊन राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे आणि मुंबई पोलीस दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिले. तसेच पाठलाग करणाऱ्या व्यक्ती कोण आहेत त्यांचा उद्देश काय आहे याबाबत तक्रार दाखल केली.


हेही वाचा – Aryan Khan Drug Case: आर्यन खान अनेक वर्षांपासून घेतोय ड्रग्ज – NCB