Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी मुंबई पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहनं दाखल, आपात्कालीन काळात मिळणार तात्काळ मदत

मुंबई पोलिसांच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहनं दाखल, आपात्कालीन काळात मिळणार तात्काळ मदत

मुंबईतील चौपाट्यांवर पेट्रोलिंग करण्यात येणाऱ्या१०ए.टी.व्ही.वाहन रिलायन्स उद्योग समूहातर्फे मुंबई पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आले

Related Story

- Advertisement -

मुंबई पोलीस दलात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अत्याधुनिक एटीव्ही (ATV) वाहने प्रदान करण्यात आली आहेत. या वाहणांची मुंबई पोलिसांना आपत्तीच्या काळात आणि गर्दीच्या ठिकाणी मोठी मदत होणार आहे. मुंबई पोलीस दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक अशा १० गाड्या दाखल झाल्या आहेत. समुद्र किनाऱ्यावर वादळी वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशामध्ये जर नैसर्गिक आपत्ती आली तर मुंबई पोलिसांना तात्काळ जलदगतीने मदत पुरवण्यासाठी या गाड्यांची मोठी मदत होणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये वेगाने मदत करण्यासाठी या गाड्या महत्त्वपुर्ण ठरणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एटीव्ही या गाड्यांचे हस्तांतरण करण्यात आले आहे. समुद्र किनाऱ्यावर गस्त घालत असणाऱ्या पोलिसांना समुद्राच्या ठिकाणी पोहचण्यास आणि वेगाने मदत करणे या गाड्यांमुळे अधिक सुलभ आणि सोपं झाले आहे. या गाड्यांचे ड्रायव्हिंग हे डाव्या बाजूला देण्यात आले आहे. या गाड्या लहान असून रेंजर ५७० ईएफआय या मॉडेलच्या गाड्या आहेत. या गाड्या लहान असल्या तरी या गाड्यांचे काम मोठ्या आपत्तीतही होणार आहे. मुंबईतील चौपाट्यांवर पेट्रोलिंग करण्यात येणाऱ्या१०ए.टी.व्ही.वाहन रिलायन्स उद्योग समूहातर्फे मुंबई पोलीस दलाला सुपूर्द करण्यात आले

- Advertisement -

मुंबई पोलिसांच्या ताफ्यात आलेले ATV हे वाहन सर्वसमावेशक असे आहे. यामुळे चौपाट्यांवरील सार्वजनिक उत्सव किंवा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत देण्यासाठी, बचाव कार्यासाठी वाहन अतिशय उपयुक्त असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या गाड्यांच्या हस्तांतरण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत, मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.

- Advertisement -