धमकी प्रकरणी सलमान खानने नोंदवला जबाब; मुंबई पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल

धमकीचे पत्र प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला आहे

Mumbai Police records Salman Khan father Salims statements after death threat

अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि लेखक सलीम खान (Salim Khan) यांना आलेले धमकीच्या पत्राची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. सलमानच्या वांद्रे येथील घराबाहेर पोलिस बंदोबस्त वाढवला आहे. याच प्रकरणावर आज सलमान खानचा जबाब नोंदवण्यात आला आहे. दरम्यान मुंबईचे पोलीस (Mumbai Police)  आयुक्त संजय पांडे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. (Mumbai Police records Salman Khan father Salims statements after death threat)

यावर संजय पांडे प्रतिक्रिया दिली की, सलमान आणि सलीम खान याना आलेले पत्र पडताळत आहे. त्यानुसार आम्ही तपास करतोय. जो तपास आवश्यक आहे. त्यानुसार तपास केला जात असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी सांगितले. सुरक्षा वाढवणे ही आमची अंतर्गत बाब आहे. जे पत्र आले आहे. त्यावर कोणताही आता निष्कर्ष काढणे योग्य नाही.आम्ही त्यावर काम करत आहोत. त्यातील कोडवर्डवरून निकष काढणे योग्य नसल्याचे पांडे यांनी सांगितले.

जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर आता अभिनेता सलमान खानचा जबाब नोंदविण्यात आहे. यावेळी त्याला कुणावर संशय आहे का? आणि अशाप्रकारे यापूर्वी कधी धमकी आली होती का असा सवाल विचारण्यात आल्याची माहिती समोर य़ेत आहे. दरम्यान सलमान खानसह त्याचे वडील सलीम खान यांच्याही जबाब नोंदवला गेला आहे.

रविवारी सलमान खानचे वडील सलीम खान हे आज सुरक्षारक्षकासोबत मॉर्निंग वॉकला गेले होते. तेव्हा सलीम खान यांच्या एका सुरक्षा रक्षकाला एका बेंचवर एक पत्र दिसले. सुरक्षा रक्षकाने ते पत्र सलीम खान याना दिले. त्या पत्रात सलमानला मुसेवाला सारखे करू असे लिहिले होते. त्या पत्र प्रकरणी सलीम खान यांनी याची माहिती वांद्रे पोलिसांना दिली.

धमकीचे पत्र प्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवला आहे. अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी आज सलमानच्या सुरक्षेचा आढावा घेतला. ते पत्र बेचवर ठेवणाऱ्या व्यक्तीचा वांद्रे पोलीस शोध घेत आहेत.


धमकीच्या पत्रानंतर सलमान खान आणि सलीम खान यांच्या सुरक्षेत वाढ, नक्की काय आहे प्रकरण?