सदावर्तेंना नोटीस पे नोटीस, मुंबई पोलीस करणार चौकशी

Mumbai Police sends notice to Gunaratna Sadavarten
Mumbai Police sends notice to Gunaratna Sadavarten

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिस त्यांची पुन्हा चौकशी करणार आहेत. सदावर्ते अटक असताना त्यांच्याविरोधात गावदेवी पोलिस ठाण्यात अनेक तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यामुळे गावदेवी पोलिस सदावर्तेंची चौकशी करणार आहेत. पोलिसांनी सदावर्तेंना 110 अंतर्गत नोटीस पाठवली आहे

खासदार शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याला सदावर्तेंना जबाबदार धरून अटक करण्यात आले होते.या प्रकरणा १६ दिवस जेलमध्ये रहावे लागले. त्यानंतर जामीनावर त्यांची जेलमधून सुटका झाली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी एसटी कष्टकरी जनसंघ ही नवी संघटना स्थापन करुन सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. नव्या संघटनेची घोषणेला ४८ तासही उलटलेले नाहीत तोपर्यंत पोलिसांनी त्यांना नवी नोटीस पाठवली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गुणरत्न सदावर्ते अटक झाली होती. त्यावेळी त्यांच्याविरोधात गावदेवी पोलिस ठाण्यामध्ये अनेक तक्रारी नोंद झाल्या आहेत. त्यामुळे गावदेवी पोलिस सदावर्तेंची पुन्हा एकदा चौकशी करणार आहेत. पोलिसांनी सदावर्तेंना ११० अंतर्गत नोटीस पाठवली आहे. याआधी सुद्धा मुंबई महापालिकेने महापालिकेच्या प्रस्ताव विभागाकडून 353 ए अन्वये दोनदा नोटीस पाठवली आहे.