घरCORONA UPDATEमुंबई पोलिसातील ३०० 'सुपर सेव्हर्स' वाचवणार कोरोना रुग्णांचे प्राण

मुंबई पोलिसातील ३०० ‘सुपर सेव्हर्स’ वाचवणार कोरोना रुग्णांचे प्राण

Subscribe

मुंबईतील कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आता मुंबई पोलिसही आरोग्य सेवेचा मदतीला धावून आले आहेत. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मुंबई पोलीस दलात ३०० सुपर सेव्हर्स तयार करण्यात येत आहे, या सुपर सेव्हर्सना केंद्राच्या ‘राष्ट्रीय जन स्वास्थ प्रशिक्षण एवं अनुसंधान संस्थे’कडून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पोलिसातील हे सूपर सेव्हर्स तयार करून लवकरच आरोग्यसेवा पुरवठा केंद्राच्या मदतीसाठी २४ तास तत्पर असतील अशी माहिती समोर येत आहे. मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन सुपर सेव्हर्सची निवड करण्यात येणार आहे.

देशात कोरोनाची महाभयंकर लाट पसरत असून दररोज हजारोच्या संख्येने कोरोनाचे रुग्ण मिळून येत आहे, अश्या अवस्थेत या रुग्णांना वेळेवर बेड, ऑक्सिजन तसेच औषध उपलब्ध होत नसल्या कारणामुळे अनेकांचा त्यात मृत्यू होत आहे. आरोग्यसेवा पुरवठा केंद्राला कोरोना रुग्णा पर्यत अथवा तेथील वैद्यकीय सेवा देणाऱ्यापर्यत पोहचता येत नाही, त्यामुळे आरोग्यसेवे अभावी कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. या आरोग्यसेवा पुरवठा केंद्राला मदत करण्यासाठी मुंबईसह राज्यातील पोलीस दलात ‘सुपर सेव्हर्स’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्यासह मुंबई पोलीस दलातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दोन सुपर सेव्हर्स असतील. त्यासाठी शासनाकडून प्रत्येक पोलीस ठाण्यातून एका अधिकारी आणि एका पोलीस अंमलदार याची निवड करण्यात येणार आहे. या सुपर सेव्हर्स ची माहिती तात्काळ मागवण्यात आली असून हि नावे केंद्राच्या ‘राष्ट्रीय जन स्वास्थ प्रशिक्षण एवं अनुसंधान संस्थेकडे पाठवली जाणार आहे. हि संस्था पोलीस दलात सुपर सेव्हर्स तयार करून राज्यभर त्यांना आरोग्यसेवेसाठी तयार करणार आहे.

- Advertisement -

एकट्या मुंबई पोलीस दलात ३०० सुपर सेव्हर्स असतील व हे सुपर सेव्हर्स मुंबईतील आरोग्यसेवा पुरवठा केंन्द्राला मदत करतील. प्रत्येक पोलीस ठाण्यात २ सुपर सेव्हर्स असतील आणि ते आरोग्य सेवा पुरवठा केंद्र यांच्या संपर्कात असतील .या संस्थेकडून पोलिसांना बदलत्या कोरोनाच्या संक्रमणाबाबत माहिती देऊन त्यांना कोरोना रुग्ण हाताळणे, आरोग्यसेवेला मदत करणे, घरी विलगीकरनातं असणाऱ्यांची माहिती आरोग्यसेवेला देणे, लसीकरण संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करणे अशा प्रकारचे प्रशिक्षण सुपर सेव्हर्स यांना देण्यात येणार आहे. या सुपर सेव्हर्स याचा फायदा नागरिक, कोरोना रुग्ण, त्याची नातेवाईक आणि आरोग्यसेवा पुरवणाऱ्या केंद्राना होणार असून या सुपर सेव्हर्स मुळे कोरोनामुळे होणारे मृत्यू टाळता येतील तसेच रुग्णाना कोरोनावर मात करता येईल अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.


कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांसाठी टास्क फोर्स, महिला आणि बालविकास विभागाचा निर्णय


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -