चंद्रावरून अंतराळवीराने मुंबई पोलिसांकडे मागितली मदत; त्याला मिळाले असे उत्तर

तुमच्या आयुष्यात काही आपतकालीन परिस्थिती असल्यास कसलीही वाट न बघता थेट १०० नंबर डायल करा, असे ट्विट मुंबईत पोलिसांनी मंगळवारी केले. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी आपली मते नोंदवली. काहींनी तक्रारींचा पाढा वाचत या ट्विटवर टीका केली. तर काही नेटकऱ्यांनी या ट्विटचे कौतुक केले. त्यातील एक नेटकऱ्याने मुबई पोलिसांच्या या ट्विटला मजेशीर रिट्विट केले. त्याने चंद्रावर उभ्या असलेल्या एक अंतराळवीराचा फोटो ट्विटला जोडला. या फोटोखाली त्याने लिहिले की, मी येथे अडकलो आहे. मला मदत हवी आहे.

मुंबईः चंद्रावर पोहोचलेल्या अंतराळवीराने मदतीसाठी थेट मुंबई पोलिसांकडे संपर्क साधला. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवर मदतीसाठी आलेल्या या मजेशीर ट्विटला पोलिसांनीही गंमतीदार उत्तर दिले आहे. तुम्ही जेथून तक्रार करत आहात ते आमच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. तरीही तुम्ही चंद्र आणि आमच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवलात त्याचा आम्हाला आनंद आहे, असे उत्तर मुंबई पोलिसांनी ट्विट करुन दिले आहे.

तुमच्या आयुष्यात काही आपतकालीन परिस्थिती असल्यास कसलीही वाट न बघता थेट १०० नंबर डायल करा, असे ट्विट मुंबईत पोलिसांनी केले. त्यावर अनेक नेटकऱ्यांनी आपली मते नोंदवली. काहींनी तक्रारींचा पाढा वाचत या ट्विटवर टीका केली. तर काही नेटकऱ्यांनी या ट्विटचे कौतुक केले. त्यातील एक नेटकऱ्याने मुबई पोलिसांच्या या ट्विटला मजेशीर रिट्विट केले. त्याने चंद्रावर उभ्या असलेल्या एका अंतराळवीराचा फोटो ट्विटला जोडला. या फोटोखाली त्याने लिहिले की, मी येथे अडकलो आहे. मला मदत हवी आहे.

या ट्विटला पोलिसांनी गंमतीदार उत्तर दिले. तुम्ही ज्या ठिकाणी आहात ते आमचे कार्यक्षेत्र नाही. पण तुम्ही चंद्र आणि आमच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवलात याचा आम्हाला आनंद आहे, असे उत्तर मुंबई पोलिसांनी त्या नेटकऱ्याच्या ट्विटला दिले आहे.

नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई पोलीस सोशल मिडियाच्या माध्यमातून सतत काही ना काही पोस्ट करत असतात. नागरिकांना नियम पाळण्याचे सल्लेही मुंबई पोलीस साोशल मिडियाच्या माध्यमातून देत असतात. मुंबई पोलिसांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर नागरिक तक्रारीही करत असतात. या तक्रारींचे निरसन करण्याचे काम पोलीस करत असतात. तक्रारीवर कारवाई केल्यानंतर त्याचा तपशीलही ट्विटरवर दिला जातो.