घरताज्या घडामोडी'तिच्या घरी ११नंतर राहिलो तर?' तरुणाच्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर

‘तिच्या घरी ११नंतर राहिलो तर?’ तरुणाच्या प्रश्नाला मुंबई पोलिसांनी दिले भन्नाट उत्तर

Subscribe

ब्रिटनमधील नव्या कोरोना व्हायरसच्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर राज्यात नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. राज्यात हा नाईट कर्फ्यू ५ जानेवारीपर्यंत असणार आहे. रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असणार आहे. त्यामुळे सध्या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी बाहेर जाणाऱ्याची चांगली गोची झाली आहे. तसेच मुंबई पोलिसांकडून नाईट कर्फ्यू दरम्यान बाहेर पडणाऱ्यांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले असून कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान मुंबई पोलीस हे नेहमी भन्नाट ट्विटमुळे चांगलेच चर्चेत असतात. आता देखील त्यांची भन्नाट ट्विटवर प्रतिक्रियेची चांगली चर्चा होत असून ते ट्विट तुफान व्हायरल होत आहे.

एका दिपक जैन नावाच्या ट्विटर युझरने मुंबई पोलिसांना प्रश्न केला आणि त्याच प्रश्नाला मुंबई पोलिसांनी भन्नाट उत्तर दिले आहे. आज सकाळी मुंबई पोलिसांनी ‘ऑनलाईन एकत्र या’ असे ट्विट करून आवाहन केले होते. त्याच ट्विटवर दिपक जैन अशी कमेंट केली की, ‘मी जर तिच्या घरी ११ वाजता पोहोचलो आणि रात्रभर तिच्याच घरी राहिलो तर…’ यावरच मुंबई पोलिसांनी असे उत्तर दिले की, ‘तिची तू भेटण्यासाठी परवानगी घेतली असावी अशी आम्हाला आशा आहे. नाहीतर तुझ्या राहण्यासाठी आमच्या डोक्यात एक पर्यायी व्यवस्था आहे.’

- Advertisement -


हेही वाचा – मुंबईकरांनो थर्टी फर्स्टची पार्टी करणार आहात? मग ही बातमी वाचाच

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -