घरताज्या घडामोडीअंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची स्कॉर्पिओ : NIA कडे तपास जाऊ नये म्हणून मुंबई...

अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची स्कॉर्पिओ : NIA कडे तपास जाऊ नये म्हणून मुंबई पोलिसांची मोठी फिल्डिंग

Subscribe

जैश उल हिंदने या स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारची जबाबदारी स्विकारलेली असली तरीही या दहशतवादी संघटनेचा या संपुर्ण प्रकरणात सहभाग असल्याची शक्यता नसल्याचे मुंबई पोलिसांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या संपुर्ण प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांचा गुन्हे अन्वेषण विभाग करत आहे. पण जैश उल हिंदने इन्स्टाग्राम पोस्ट करून केलेला दावा आणि स्विकारलेली जबाबदारी यामध्ये तथ्य नसल्याचे मुंबई पोलिसांमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई पोलिसांच्या तपासामध्ये रविवारी सकाळी टेलिग्रामवर आढळलेली जैश उल हिंदची क्रिप्टोकरन्सी अॅड्रेस लिंकदेखील योग्य नसल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये जैश उल हिंदने अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्कॉर्पिओत स्फोटाची जबाबदारी घेतली होती. याच दहशतवादी संघटनेकडून दिल्लीतल्या इस्रायली दुतावासाबाहेर सापडलेल्या आईडीची जबाबदारी घेतली होती. त्या प्रकरणातही दिल्ली पोलिसांना या गटाशी संबंधित काहीच हाती लागले नव्हते.

स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओचा कट आपण केला असल्याचे सांगून जैश उल हिंद तपास भरकटवण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. एकंदरीतच मुंबई पोलिस आपली संपुर्ण ताकद या प्रकरणासाठी लावत आहे. मुंबई पोलिसांचे मोठ्या प्रमाणात युनिट्स या प्रकरणावर काम करत आहे. या प्रकरणात दहशतवादी कनेक्शन सापडले तर हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणेकडे जाऊ शकते. म्हणूनच मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात कसून तपास होत आहे. लवकरच या प्रकरणात मोठा उलघडा मुंबई पोलिसांकडून होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

- Advertisement -

जैश उल हिंदने केलेल्या दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांना यामधून कोणताही आर्थिक फायदा घ्यायचा नाही असे स्पष्ट केले होते. तसेच आधीचा मॅसेजही आमच्याकडून नव्हता असे सांगत जैश उल हिंदने या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच कोणत्याही गोष्टीसाठी त्यांनी हा प्रकार केला नसल्याचे संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या संपुर्ण प्रकरणात पोलिस आता फॉरेन्सिक विभागाची मदत घेत आहेत. त्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजही फॉरेन्सिक टीमकडून तपासण्यात येत आहेत. या प्रकरणात स्फोटके पुरवणाऱ्या इनोव्हा गाडीचा शोधही पोलिसांकडून सुरू आहे. स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ पार्क करून या प्रकरणातील दोन आरोपी हे इनोव्हामधूनच अंबानींच्या घराबाहेरून सटकले होते.

मुंबई पोलिसांकडून या प्रकरणात आतापर्यंत दहशतवादी संघटनेचा कोणतेही कनेक्शन आढळले नसल्याचे मुंबई पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हे प्रकरण केंद्राकडे म्हणजे नॅशनल इनव्हेस्टिंगेशन एजन्सी (NIA) जाऊ नये यासाठी संपुर्णपणे मुंबई पोलिसांची टीम कामाला लागली आहे. मुंबई पोलिसांचे मोठ्या प्रमाणात असे युनिट्स या तपासासाठी कामाला लागले आहेत. कारण दहशतवादी कनेक्शन सापडले तर हे संपुर्ण प्रकरण मुंबई पोलिसांच्या ताब्यातून केंद्राकडे जाईल. म्हणूनच या प्रकरणातील मोठा उलघडा करण्यासाठी मुंबई पोलिसांनी आपली संपुर्ण यंत्रणा या कामासाठी लावलेली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -