HomeमुंबईMumbai Crime : संतापजनक! बेस्टच्या डेपो मॅनेजरची महिला कंडक्टरकडे शरीर सुखाची मागणी,...

Mumbai Crime : संतापजनक! बेस्टच्या डेपो मॅनेजरची महिला कंडक्टरकडे शरीर सुखाची मागणी, नकार दिल्यानं…

Subscribe

कंडक्टर महिलेने एक व्हिडिओ प्रसारित करून डेपो मॅनेजरवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र, पोलिसांकडून महिलेच्या आरोपांची कोणतीही दखल घेण्यात आली नाही.

राज्यात अत्याचाऱ्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे. अशातच मुंबईत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेस्टमधील महिला कर्मचाऱ्याकडे डेपो मॅनेजरने कामाच्या बदल्यात शरीर सुखाची मागणी केली आहे. शरीर सुखास नकार दिल्यानं मॅनेजरने दुसऱ्या आगारात महिलेची बदली केली. तसेच, महिलेने तक्रार करूनही पोलिसांनी मॅनेजरवर कोणतीही कारवाई केली नसल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. पोलिसही कारवाई करत नसतील, तर जनतेनं कुणाकडे दाद मागायची? असा सवाल उपस्थित होत आहे.

नेमकं घडलं काय?

प्रतीक्षा नगर आगारातील बेस्टमध्ये काम करत असलेल्या कंडक्टर महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओतून महिलेने डेपो मॅनेजर लुईस फर्नांडिसवर गंभीर आरोप केले आहेत.

हेही वाचा : महिला सन्मानाला बाधा येईल असे कृत्य खपवून घेणार नाही; मुख्यमंत्र्यांनी प्राजक्ता माळीला केले आश्वस्त

लुईस फर्नांडिसने कामाच्या बदल्यात पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली. शरीर सुख देण्यास नकार दिल्यानं महिलेची सांताक्रुज आगारात बदली करण्यात आली. तसेच, तिला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकीही फर्नांडिसने दिली.

याप्रकरणी महिलेने फर्नांडिसविरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी फर्नांडिसवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट गुन्हा मागे घेण्यासाठी फर्नांडिसने महिला कंडक्टवर दबाव टाकला. मात्र, आता बेस्ट प्रशासन लुईस फर्नांडिसवर कोणती कारवाई करणार? पोलीस प्रशासन फर्नांडिसला अटक करणार का? हे प्रश्न आता उपस्थित होत आहे.

हेही वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरण बाजूला करण्यासाठी…; काय म्हणाल्या सुषमा अंधारे?