घरमहाराष्ट्रपुणेमुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल दरांत 1 एप्रिलपासून वाढ; 'असे' आहेत नवे दर

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल दरांत 1 एप्रिलपासून वाढ; ‘असे’ आहेत नवे दर

Subscribe

1 एप्रिलपासून टोल दरांत तब्बल 18 टक्क्यांनी वाढ होणार आहे. मुंबई- पुणे असा प्रवास करणा-यांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

नव्या आर्थिक वर्षात नागरिकांच्या खिशाला आणखी एक चटका बसणार आहे. मुंबई- पुणे एक्स्प्रेस महामार्गावरच्या टोल दरात वाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून टोल दरांत तब्बल 18 टक्क्यांनी वाढ होणार आहे. मुंबई- पुणे असा प्रवास करणा-यांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.

नव्या दरांनुसार, कारचा टोला 270 रुपयांवरुन 316 रुपये होणार आहे. तर बससाठी टोलचा दर 795 वरुन 940 रुपयांवर जाणार आहे. ट्रकसाठी इथे सध्या 580 रुपये दयावे लागत होते . आता यापुढे 685 रुपये द्यावे लागणार आहेत. तर टेम्पोसाठी 420 रुपयांऐवजी 495 रुपये इतका टोल भरावा लागणार आहे.

- Advertisement -

पुणे- मुंबई या दोन शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे अनेकदा मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक कोंडी आणि अपघात या दोन्हीमुळे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वे कायम चर्चेचा विषय ठरतो. अनेकदा यावर प्रशासनाकडे प्रश्न विचारले जातात. मात्र, त्यावर तोडगा काढला जात नाही, सुविधा पुरवल्या जात नाहीत. टोल वाढ मात्र केली जाते. यावेळी सध्याच्या दरापेक्षा 50 ते 70 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

( हेही वाचा: कामगाराची हत्या करून पळालेल्या आरोपीस कल्याण रेल्वे स्थानकात अटक )

- Advertisement -

1 एप्रिलपासून टोल दरवाढ

1 एप्रिलपासून देशात टोल टॅक्सच्या दरात वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे रस्ते मार्गाने प्रवास करण्यांच्या खिशाला चटका बसणार आहे. देशातील काही राज्यांमध्ये ही टोल दरवाढ लागू असणार आहे. यामध्ये राजस्थान, उत्तर प्रदेश , पंजाब या राज्यांचा समावेश आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून ही टोल दरवाढ करण्यात आली असून, याचे थेट परिणाम राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गाने प्रवास करणा-या वाहनधारकांना भोगावे लागणार आहेत. या मार्गावर सरासरी 5 ते 10 टक्के टोलवाढ केली जाऊ शकते.

विनायक मेटेंच्या निधनानंतर मुंबई- पुणे एक्स्प्रेस हायवे चर्चेत

शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचा मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला होता. हा पहिलाच मृत्यू नाहीतर याआधी अनेकांनी या ठिकाणी जीव गमावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -