मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ९ जुलैला राहणार बंद

माहिती-दिशादर्शक फलक बसवण्याचे काम दुपारी १२ ते २ या वेळेत हे काम होणार मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे बंद

mumbai-pune express way
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे ९ जुलै रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद असणार आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी असणारे माहिती-दिशादर्शक फलक बसवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे ९ जुलै रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन तास बंद राहणार आहे.

अवजड वाहनांची वाहतूक बंद

माहिती-दिशादर्शक फलक बसवण्याचे काम दुपारी १२ ते २ या वेळेत हे काम होणार असल्याने या वेळात अवजड वाहनांना पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.

लहान वाहने जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात येणार

हे काम सुरू असताना सर्व प्रकारची वाहने एक्स्प्रेसवेवरील खालापूर टोलनाका आणि कुसगाव टोलनाक्यापूर्वी थांबवण्यात येतील. तर चारचाकी वाहने व इतर प्रवासी वाहने ही एक्स्प्रेसवेवरील कुसगाव टोलनाका येथून जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात येणार असून ही वाहतूक सुरळीत सुरू राहणार आहे.